आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगात गेल्यानंतर अवघ्या 7 तासांतच शिबू सोरेन यांची सून आजारी, हॉस्पिटलमध्ये दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या स्नूषा सीता सोरेन यांनी मंगळवारी स्थानिक न्यायालयात शरणागती पत्करली. त्यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. 2012 मधील राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. 20 फेब्रुवारी रोजी झारखंड उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्या कोर्टाला शरण आल्या आहेत. सीबीआयने त्यांच्या विरोधात खटला दाखल केला होता. सीता सोरेन या शिबू सोरेन यांच्या थोरल्या दिवंगत मुलाची पत्नी आहे.

सीता सोरेन कोर्टाला शरण आल्यानंतर त्यांचे वकील विश्वजीत मुखर्जी यांनी तुरुंगात त्यांना योग्य ती वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी केली. न्यायाधीशांनी त्यांना मागणी लिखित स्वरुपात देण्याचे सांगितले. वकीलांनी दिलेल्या अर्जात त्यांना थॉयराइड आणि इतर आजार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोर्टाने तुरुंग अधिक्षकांना त्यांना योग्यती सुविधा देण्याचे निर्देश दिले. जवळपास 20 मिनीटांच्या सुनावणीनंतर त्यांना सकाळी 11.20 वाजता तुरुंगात पाठविण्यात आले. सायंकाळी छातीत दुखत असल्याची त्यांनी तक्रार केली त्यानंतर त्यांना 'रिम्स' दाखल करण्यात आले. तुरुंगात गेल्यानंतर अवघ्या सात तासामध्ये त्या बाहेर आल्या आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, साक्षीदाराचे केले अपहरण