आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुझफ्फरनगर- समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी मुझफ्फरनगर येथील दंगलग्रस्तांमध्ये कॉंग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे म्हटल्यानंतर उत्तर प्रदेश प्रशासनाने शरणार्थी शिबिरांमध्ये कारवाई सुरु केली आहे. या शिबिरातून लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून गेल्या दोन दिवसांमध्ये 30 कुटुंबांना हलविण्यात आले आहे. लोई येथील शिबिरांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणाहून सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी इंद्रमणि त्रिपाठी यांनी सांगितले, की मोबदला मिळालेल्या 100 लोकांना शिबिरातून परत पाठविण्याची तयारी सुरु आहे. आतापर्यंत 167 कुटुंबियांना मोबदला देण्यात आलेला आहे. काही जणांनी दफनभुमीवर तंबू लावले होते. अशा लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कौशलराज शर्मा यांनी सांगितले, की लोई शिबिरातून 20 जण गावी परतले होते. गुरुवारी आणखी 9 जणांना परत पाठविण्यात आले. थंडी वाढल्यामुळे शिबिरातील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. त्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविणे आवश्यक आहे.
प्रशासनाकडून दंगलग्रस्तांना गावी परत पाठविण्याची तयारी सुरु आहे. परंतु ते कोणत्याही परिस्थितीत परतण्यास तयार नाहीत. त्यांच्या मनात अजुनही भय आहे. त्यामुळे शिबिरातून लोकांना का हटविण्यात येत आहे, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही.
राहुल गांधी म्हणाले होते गावी परत फिरा... वाचा पुढे..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.