आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे अपघातानंतर गँगमन फरार, अभियंत्याने फोन केला बंद; रेल्वे लाईन जोडलीच नसल्याचे उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरनगर - रेल्वे अपघातानंतर चौकशी सुरू असताना अपघाताची कारणे समोर येत आहेत. त्यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी ट्रेन रुळावर येण्यापूर्वी संबंधित मार्गाची लाईन जोडलीच नव्हती अशी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अपघाताच्या वेळी गेटमन आणि अभियंत्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप जाहीर झाली आहे. तेव्हापासूनच गँगमन फरार झाला असून त्या ठिकाणची जबाबदारी असलेल्या नवीन कनिष्ठ अभियंत्याने आपला फोन बंद केला आहे. 
 
 
ऑडिओ क्लिपमध्ये नेमके काय?
- ऑडियो क्ल‍िपमध्ये गेटमन सांगत होता, रेल्वे येणार आहे आणि लाईन अद्याप जोडण्यात आलेली नाही. तरीही कुठल्याही प्रकारच्या धोक्याची घंटा वाजवण्यात आली नाही. येणाऱ्या ट्रेनला लाल दिवा किंवा झेंडा सुद्धा दाखवण्यात आला नाही. 
- या दोघांच्या संभाषणानुसार, रुळावर काम करणारे बहुतांश कमर्चारी अशाच प्रकारचा निष्काळजीपणा करतात. रेल्वे कर्मचारी येतात, पण काम न करता नुसते बसून राहतात अशी त्या दोघांची चर्चा होती. नुकतेच कनिष्ठ अभियंते नियुक्त झाले आणि त्यांचे आदेश जुने कनिष्ठ कर्मचारी मानत नाहीत. मनमानी कारभार करत असतात असा त्या अभियंत्याचा आरोप होता. 
- या संभाषणात गेटमॅनने असेही म्हटले की ड्युटीवर तैनात गँगमन अपघातानंतर पसार झाले आहेत. आणि नवीन जेईने आपला फोन बंद केला आहे.
 
 
उत्तर प्रदेशात शनिवारी संध्याकाळी आणखी एक रेल्वे अपघात झाला. पुरीहून हरिद्वारला जात असलेल्या उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे मुजफ्फरनगरमध्ये रुळावरून घसरले. संध्याकाळी ५.४६ वाजता खतौली स्टेशनजवळ झालेल्या या दुर्घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. ६० पेक्षा जास्त जखमींपैकी ४० जणांची प्रकृती गंभीर आहे.
 
जखमींच्या उपचारांसाठी मुजफ्फरनगरच्या रुग्णालयांतील आपत्कालीन वाॅर्ड रिकामे करण्यात आले आहेत. उलटलेल्या रेल्वे डब्यांत अडकलेल्या लोकांना काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

या घटनेमागे अतिरेकी हल्ल्याचा कट असल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी रुळाचे काही तुकडे सापडले आहेत. यूपी एटीएसचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, दिल्ली-हरिद्वार-डेहराडून रेल्वेमार्ग ठप्प झाला आहे. १२ पेक्षा जास्त गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत.

१०५ किमी रेल्वेचा वेग, कॉलेजमध्ये घुसला डबा
दुर्घटनेच्या वेळी रेल्वे ताशी १०५ किमी वेगाने धावत होती. मीरत कँटनंतर पुढचा थांबा मुजफ्फरनगर होता. मात्र, त्याच्या २५ किमी आधीच खतौलीत रेल्वे रुळावरून घसरली. प्रत्यक्षदर्शींनुसार खतौली स्टेशन पार करून जगत कॉलनीपर्यंत पोहोचताच तिसरा डबा रुळावरून घसरला. यानंतर १३ डबेही घसरत गेले. पाच डब्यांचा चेंदामेंदा झाला. दोन डबे एकमेकांवर चढले. कॉलनीतील काही घरांनाही डब्यांनी धडक दिली. एका काॅलेजच्या इमारतीत एक डबा घुसला.

१० राज्यांतून जाते रेल्वे : उत्कल एक्स्प्रेस रोज रात्री नऊ वाजता ओडिशाच्या पुरीहून निघाल्यानंतर १० राज्ये पार करून हरिद्वारला पोहोचते. यात उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशाचा समावेश अाहे.
 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...