आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणाच्या सहा मुली दोन्ही हातांनी लिहितात इंग्रजी, हिंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिंद- हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील उझाना गावातील सहा मुलींचे एका हाताने इंग्रजी आणि दुसऱ्या हाताने हिंदी लिहिण्याचे कौशल्य पाहून भलेभले थक्क झाले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही हातांचे लिखाण बिलकुल एकसारखे आहे. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइनपासून प्रेरणा घेऊन त्यांनी केवळ सहा महिन्यांत हे कौशल्य अवगत केले आहे.

पूजा, प्रिया, तमन्ना, मोनिका, ईशा आणि मन्नू या सहा मुली गावातीलच स्वामी विवेकानंद शाळेतील नववी वर्गात शिकतात. सहा महिन्यांपूर्वी शिक्षक कुलदीपसिंह जेव्हा वर्गात विज्ञान विषय शिकवत होते तेव्हा सापेक्षता सिद्धांत या धड्यात अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा उल्लेख आला. आइन्स्टाइन यांनी दररोज सराव करून दोन्ही हातांनी लिहिण्याचे कौशल्य प्राप्त केल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यानंतर सहा मुलींनी ही कला अवगत करण्याचा निश्चय केला. सुरुवातीला शाळेतील तासिका होत नसलेल्या वेळेत त्यांनी सराव सुरू केला. काही दिवसानंतर आपण ही गोष्ट करू शकत असल्याचा आत्मविश्वास त्यांना झाला. त्यानंतर दोन्ही हातांनी लिहिण्याची गती वाढत गेली. लिखाणातही सुधारणा होत होती. यामध्ये पुढे जाऊन त्यांनी एका हाताने हिंदी आणि दुसऱ्या हाताने इंग्रजी लिहिण्याचा सराव सुरू केला. सहा महिन्यानंतर दोन्ही हातांनी लिहिताना त्यांना काहीही अडचण आली नाही. दोन्ही हातांनी लिहिण्याची कला पाहुन शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबातील लोक खूप आनंदी होतात.

शिक्षक कुलदीपसिंह म्हणाले की, सर्व मुली या गावातील शेतकरी कुटुंबातील आहेत. अभ्यासातही त्या हुशार आहेत. मी जेव्हा महाविद्यालयात जायचो तेव्हा मीसुद्धा दोन्ही हातांनी लिहिण्याचा प्रयत्न करायचो. परंतु यश मिळाले नाही. मी पण आइन्स्टाइनपासून प्रेरणा घेतली आहे. त्यामुळे वर्गात जेव्हा केव्हा आइन्स्टाइनचा धडा शिकवतो तेव्हा त्यांच्या जीवनातील विविध कथा सांगत असतो, असेही कुलदीपसिंह यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...