आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Six Important Things In Mars Orbitar Mission News In Divya Marathi

कधी झाली मंगळ मोहिमेला सुरवात; जाणून घ्या, या मोहिमेबद्दलच्या 6 महत्त्वपूर्ण बाबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेली भारताची मंगळ मोहिम आज यशस्वीरीत्या पार पडली. यामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे. या आनंदाच्या क्षणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळ मोहिमेच्या यशासाठी शास्त्रज्ञ आणि देशातील सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे. बंगळुरूच्या इस्रो सेंटरमध्ये या मोहिमेच्या यशाचे साक्षीदार बनलेले मोदी म्हणाले की, आज MOM (Mars Orbiter Mission) चे मंगळाशी मिलन झाले. मार्स ऑर्बिटर मिशनचा शॉर्ट फॉर्म मॉम आहे, आणि मॉम कधी निराश करत नाही. मिशनचा शॉर्ट फॉर्म जेव्हा मॉम असल्याचे मला समजले तेव्हाच ही मोहीम यशस्वी होणार याचा विश्वास होता, असेही ते यावेळी म्हणाले.
जाणून घेऊयात या महत्त्वाच्या मंगळ मोहिमेबद्दलच्या अत्यंत महत्तवपूर्ण बाबी

१) MOM म्हणजे काय? कधी झाली मंगळ मोहिमेची सुरूवात
मार्स ऑर्बिटर मिशन (MOM) असे या मोहिमेचे नाव आहे. मागील वर्षी म्हणजेच ५ नोव्हेंबर २०१३ (मंगळवार) या दिवशी दुपारी 2 वाजून 38 मिनिटांनी "पीएसएलव्ही सी-25'च्या साह्याने श्रीहरीकोटा (आंध्रप्रदेश) येथील अंतराळ संशोधन केंद्रातून या मंगळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले. मंगळयानाचे वजन तब्बल 1 हजार 350 किलो आहे. या मंगळ मोहीमेसाठी 300 दिवसांचा कालावधी ठरवण्यात आला होता. 300 दिवसांनंतर हे यान मंगळाच्या कक्षेत पोहोचणार होते. 1 डिसेंबर २०१३ पर्यंत हे यान पृथ्वीच्या कक्षेत होते. त्यानंतर एकूण 40 कोटी किमीचा प्रवास करून उपग्रह आज म्हणजेच 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळाच्या कक्षेत पोहोचेल अशी अपेक्षा करण्यात येत होती. आज ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर शास्त्रज्ञांचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.

पुढील स्लाईडमध्ये वाचा, काय उद्देश आहे या मोहिमेचा...