आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोफेसरची पदरमोड, अकरा वर्षांत लावले 6 लाख वृक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामसिंहपूर (राजस्थान)- राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातील एका गावाचा परिसर हिरवाईने नटलेला दिसतो. ही किमया एका प्रोफेसरने केली आहे. गेली ११ वर्षे त्यांनी पदरमोड करून पर्यावरण संरक्षणाचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

श्यामसुंदर जानी असे पर्यावरण प्रेमी प्रोफेसरचे नाव असून त्यांनी ११ वर्षांत सुमारे लाख रोपट्यांची देखभाल केली आहे. लाखाहून अधिक घरात त्यांनी वृक्षारोपण केले. २५०० शाळा हजारो शेतकऱ्यांच्या शेतात त्यांनी झाडे लावली आहेत. त्यांची ही जिद्दीची कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरली आहे. बिकानेरच्या डुंगर महाविद्यालयात ते समाजशास्त्राचे विभागप्रमुख आहेत. त्याशिवाय ते राजस्थान सरकारचा वनविभाग, शिक्षण विभाग, केंद्र सरकारचा कृषी विभाग केंद्रीय युवा कल्याण-क्रीडा मंत्रालयाच्या उपक्रमांतही ते सक्रिय सहभागी असतात.
रोपट्यांची खरेदी, ती तयार करणे, गावापर्यंत पोहचवणे इत्यादी कामे ते स्वत:च करतात. यासाठी ते आपला संपूर्ण पगार खर्ची घालतात. कधी-कधी दैनंदिन खर्चासाठी देखील घरातून पैसे मागवावे लागतात. एवढेच नव्हे तर पर्यावरण संरक्षणाच्या कार्यात त्यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी असते. ते त्यांचे कुटुंब झाडांना घरातील सदस्य मानतात त्यांची देखभाल करतात, असे जानी यांनी सांगितले.

२०१२ मध्ये राष्ट्रपती यांच्याकडून सन्मान
श्याम सुंदर जानी यांना पर्यावरण संरक्षणातील कार्याबद्दल २०१२ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आले होते. दैैनिक भास्करच्या वतीनेही जानी यांना राज्यस्तरीय ग्रीन आयडल अवॉर्ड प्रदान केला होता.
बातम्या आणखी आहेत...