आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झारखंडमध्ये चकमकीत सहा नक्षलवादी ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - झारखंडच्या लाटेहार या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील जंगलात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांशी झालेल्या चकमकीत बुधवारी सहा नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळाहून ६०० काडतुसे आणि एक डझन आयईडीसह स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

झारखंडचे सीआरपीएफचे महानिरीक्षक (कारवाई) संजय ए. लाठकर यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफचे जवान लाटेहार जिल्ह्यातील उत्तर कोएल नदीच्या तीरावरील करमडीह-छिप्पाडोहर जंगलात कारवाईसाठी गेले होते. तेथे सकाळी सात वाजता ही चकमक सुरू झाली. आम्हाला गणवेशात असलेल्या सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले आहेत. त्याशिवाय विविध बंदुका आणि रायफलची ६०० काडतुसे, सुमारे १२ आयईडी, एक इन्सास रायफल, एक एसएलआर, एक कार्बाइन आणि तीन इतर शस्त्रे घटनास्थळी आढळली. त्याशिवाय काही स्फोटके, कॉर्डेक्स वायरहीज जप्त करण्यात आले. अजूनही शोधमोहीम सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे पुन्हा चकमक होण्याची शक्यता आहे.

लाठकर म्हणाले की , सीआरपीएफच्या कोब्राची २०९ वी तुकडी तसेच इतर काही तुकड्या गेल्या दोन दिवसांपासून कारवाईसाठी जंगलात गेल्या आहेत. नक्षलवाद्यांच्या बाजूने गोळीबार सुरू झाल्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी गोळीबार सुरू केला. काही काळ ही चकमक चालली. त्यानंतर काळे कपडे घातलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले.

कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शन (कोब्रा) हे सीआरपीएफचे जंगलात कारवाई करणारे युनिट असून ते प्रामुख्याने झारखंड, छत्तीसगड आणि इतर नक्षलग्रस्त राज्यांमध्ये तैनात केले आहे.
बातम्या आणखी आहेत...