आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतसर: भरधाव कार घुसली घरात, 6 जणांना चिरडले; मृतांमध्ये 4 मुलांचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगड- पंजाबमधील अमृतसर येथे एका भरधाव कारने 6 जणांना चिरडले. मृतांमध्ये 4 मुलांचा समावेश आहे. खाजला भागात काल (बुधवारी) सायंकाळी हा भीषण अपघात झाला. अपघातात आठ जण जखमी झाले आहेत.

कारचालक दारुच्या नशेत होता. त्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हरभजन सिंग असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या अपघाताचे दु:ख व्यक्त केले आहे. अपघाताची सखोल चौकशी करून मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचे आदेशही अमरिंदर सिंग यांनी दिले आहे. 

भरधाव कार घुसली घरात...
- पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी हरभजन सिंग याच्या कारमध्ये देशी दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. तसेच अपघात झाला तेव्हा तो नशेत तर्रर्र होता.
- त्याने आधी रोडाशेजारी असलेल्या दुकानाला धडक दिली. नंतर सहा जणांना चिरडून कार थेट घरात घुसली.
- पलविंदर, मोटा सिंग, जोबन आणि गोपी अशी मृतांची नावे आहे. इतर दोघांची अद्याप ओळख पटलेली नाही.

पुढील स्लाइडवर क्लिक करून फोटोमधून पाहा अपघाताची भीषणता...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...