आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : लखनऊमध्ये फटाका कारखान्याच्या स्फोटात सहा ठार, 20 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : स्फोटानंतर जखमींना रुग्णालयात घेऊन जाताना मदतकार्य करणारे जवान

लखनऊ - शनिवारी सकाळी एका फटाका फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी पोहोचले असून, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मृतांच्या वारसाला दोन-दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
आजुबाजुच्या घरांचेही नुकसान
मोहनलालगंजमधील सिसेंडी परिसरातील ही घटना आहे. हा स्फोट एवढा मोठा होता की, त्यात कारखाना पूर्णपणे उध्वस्त झाला. पण त्याचबरोबर आजुबाजुच्या घरालाही भेगा पडल्या. प्राथमिक तपासणीत समोर आलेल्या माहितीनुसार या कारखान्यात अवैधरित्या फटाके तयार करण्याचे काम सुरू होते. पोलिस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे घर शफी मास्टर यांचे आहे. याठिकाणाहून विना परवाना मोठ्या प्रमाणावर दारु गोळीही जप्त करण्यात आला आहे. गावक-यांच्या मते सुमारे 15 वर्षांपूर्वीही याठिकाणी स्फोट झाला होता. पण त्यावेळी झालेला स्फोट एवढा मोठा नव्हता.
स्फोटाच्या आवाजाने परिसरात खळबळ
स्फोटाच्या आवाजात परिसरात खळबळ माजली आहे. परिसरातील लोकांनी स्फोटानंतर लगेचच याठिकाणी गर्दी केली. गावक-यांनी ढिगा-यातील लोकांचे मृतदेह काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी पोहोचले.

पुढील स्लाइड्वर पाहा स्फोटाचे काही फोटो...