आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवा: JEच्या श्रीमुखात लगावणाऱ्या माजी मंत्र्याला माफी, उपमुख्यमंत्री म्हणाले- हा तर छोटा गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रांन्सिस डिसूजा. - Divya Marathi
गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रांन्सिस डिसूजा.
पणजी (गोवा) - एका शासकीय कर्मचाऱ्याच्या श्रीमुखात भडकवल्याच्या आरोपात तुरुंगात असलेले माजी कॅबिनेट मंत्री फ्रान्सिस्को मिकी पचेको यांना गोवा सरकारने क्षमा करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर, हा निर्णय योग्यच असल्याचा दावा करत उपमुख्यमंत्री फ्रांन्सिस डिसूजा म्हणाले, एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या थोबाडीत मारणे हा फार छोटा गुन्हा आहे. मात्र, पचेको यांच्या मुक्ततेवर अजून राज्यपालांनी निर्णय घेणे बाकी आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री
डिसूजा म्हणाले, 'मंत्रिमंडळाने पचेको यांच्या सुटकेच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे. आयपीसीच्या कलमांनूसार हा मायनर ऑफेंस (छोटा गुन्हा) आहे.'
राज्यपालांना घ्यायचा अंतिम निर्णय
गुरुवारी गोवा मंत्रिमंडळाने राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पचेको यांना माफ करण्याचा सल्ला दिला. मात्र राज्यपालांचा निर्णय अजून समोर आलेला नाही. त्यांच्याकडे दया अर्ज अजून प्रलंबित आहे.

सरकारच्या निर्णयाला विरोध
गोवा सरकारच्या या निर्णयाला अनेकांनी विरोध दर्शवला आहे. राज्यातील विरोधीपक्षाने देखील सरकारच निर्णय योग्य नसल्याचे म्हटले आहे. एरिस रॉर्डिग्ज म्हणाले, राज्यपालांनी दोषी माजी मंत्र्याचा दया अर्ज रद्द करावा यासाठी त्यांना पत्र लिहिले आहे. कारण पचेको यांच्यावर अजूनही अनेक गुन्हेगारी खटले दाखल आहेत.

पॅरोलवर विधानसभेत आले पचेको
पचेको यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली आहे, त्यांनी दोन महिने तुरुंगात काढले आहेत. सध्या आमदार असलेल्या पचेको यांनी दरम्यानच्या काळात आमदारांना दिल्या जाणाऱ्या सुविधा तुरुंगात देण्याची मागणी केली आहे. त्यांनी विधानसभेत हजर राहाता यावे यासाठी पॅरोल देखील घेतला होता. विधानसभेत त्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने 100 प्रश्न देखील उपस्थित केले होते.

काय होते प्रकरण
पचेको यांनी 2006 मध्ये वीज महामंडळातील अभियंते कपिल नाटेकर यांच्या श्रीमुखात लगावली होती. या प्रकरणी त्यांना कोर्टाने सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली होती. त्यांना दोषी ठरविल्यामुळे ग्रामीण विकासमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी ते दोन महिने फरार होते. मार्च मध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांची शिक्षा कायम ठेवली तेव्हा 1 जून रोजी ते कोर्टापुढे शरण आले होते. भारतीय जनता पक्षाच्या सहकारी पक्षाचे नेते असलेल्या पचेको यांच्यावर गर्लफ्रेंडला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचाही आरोप आहे.

पुढील स्लाइडमध्ये, माजी कॅबिनेट मंत्री फ्रान्सिस्को मिकी पचेको
बातम्या आणखी आहेत...