आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP ELECTION: 'जीत की चाभी, डिंपल भाभी', गाणे - घोषणा - पंचलाइनने निवडणूकीला रंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक ऐन रंगात आली आहे. सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारकांनी यूपीच्या गल्ली बोळांची धुळ झटकण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक एक इव्हेंट झाल्यापासून अनेक प्रोफेशनल्स क्रिएटीव्ह रायटर आणि स्ट्रॅटेजिस्ट यांचीही राजकीय पक्ष मदत घेत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने याचा पुरेपूर वापर केलेला आपण पाहिला आहे.
 
सपा-काँग्रेस आघाडी घोषणातही आघाडीवर 
- घोषणांच्या युद्धात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीने सर्वांना मागे टाकले आहे. 
- समाजवादी पक्षासाठी एक प्रोफेशनल्सची टीम स्लोगन तयार करण्याचे काम करीत आहे. 
- या टीमचे फेव्हरेट नेते अखिलेश यादव आहेत. त्यामुळेच 'ये जवानी है कुर्बान, अखिलेश भय्या तुम्हारे नाम!', 'विकास का पहिया अखिलेश भैया!', 'नो कन्फ्यूजन, नो मिस्टेक, सिर्फ अखिलेश - सिर्फ अखिलेश' अशा घोषणा उत्तर प्रदेशच्या रस्त्यांवर ऐकायला मिळत आहेत. 
- तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचा ग्लॅमरस चेहरा- मुख्यमंत्र्याची पत्नी खासदरा डिंपल यादव या देखिल निवडणुकीत करिष्माई नेत्या आहेत. 
- 'जीत की चाभी, डिंपल भाभी' ही घोषणा सध्या लोकप्रिय आहे. 
- सपाची निवडणूक यंत्रणा अखिलेश यांच्या हातात असली तरी मुलायमसिंह यांना अडगळीत टाकलेले नाही, 'धरती पुत्र मुलायम सिंह' आणि 'जिसका जलवा कायम है, उसका नाम मुलायम है' या घोषणांनी याची प्रचिती येते.
- अखिलेश यांचे निवडणूक गीत 'काम बोलता है' सध्या प्रत्येकाच्या ओठांवर आहे. 
- काँग्रेसची प्रसिद्ध घोषणा आहे, 'राहुल भैया आएंगे, यूपी को बचाएंगे.'
 
   पुढील स्लाइडमध्ये पाहा, काँग्रेस आणि भाजपचे पोस्टर्स... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...