आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी रेस्टॉरंटमध्ये वेटरचे कामही केले मोदींच्या या सर्वात तरुण मंत्री महोदयांनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तीन मुलींचे वडील एक दिवस घरी येताना ज्योतिषांना घेऊन आले. त्यांना तिघींचे भविष्य विचारले. ज्योतिषी म्हणाले, लहान दोघींचे ठिक आहे, पण मोठीचे काहीही होऊ शकणार नाही. हे शब्द मोठ्या मुलीला चांगलेच जिव्हारी लागले. लगेच संतापून ती म्हणाली, तुम्ही जा मीही इथेच आहे, आणि तुम्हीही आहात, दोघेही पाहू. ज्योतिषाबद्दल तर काही माहिती नाही, पण ती मोठी मुलगी आज मंत्री बनली आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी स्थान मिळवले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात त्या सर्वात तरुण मंत्री असतील. भेटा यांना, या आहेत स्मृती इरानी.
टिव्हीच्या माध्यमातून घरोघरी आदर्श सून म्हणून ओळख मिळवलेल्या स्म-ती आता आता भाजपच्या उपाध्यक्ष म्हणूनही ओळखल्या जातात. आता त्या एक महत्त्वाचे मंत्रालय सांभाळणार आहेत. मोदी पंतप्रधान बनताच स्मृती यांची भाजपमधील उंची वाढली आहे. पाहुयात त्यांच्या जीवनाबद्दल असे काही, जे आजवर तुम्हाला ठाऊक नसेल.
(स्मृतीचे मॉडेलिंगच्या काळातील फोटोज स्लाईडच्या अखेरीस)
ग्लॅमरपूर्वीचे स्ट्रगल
- पंजाबी वडील आणि आसामी आईची मुलगी असणा-या स्मृतीचा जन्म दिल्लीमध्ये 23 मार्च 1976 ला झाला होता. वडीलांची कुरिअर कंपनी होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दूरस्थ शिक्षणपद्धतीने बी क़ॉम पूर्ण केले.
- स्मृती यांनी एकेकाळी दिल्लीमध्ये घरो-घरी फिरून ब्युटी प्रोडक्ट्सची मार्केटींगही केली आहे. त्यावेळी कोणीतरी त्यांना मुंबईच्या ग्लॅमर वर्ल्डमध्ये नशीब आजमावण्याचा सल्ला दिला.
- त्यानंतर स्मृती मुंबईत आल्या. 1998 मध्ये त्यांनी मिस इंडियाचे ऑडिशन दिले. निवडही झाली. मात्र वडिलांनी स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिला. पण आईने तिची साथ दिली. आईने दोन लाख रुपयेही पाठवले. स्मृती अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्या पण जिंकू शकल्या नाहीत.

- आईला पैसे परत करण्यासाठी स्मृती यांनी नोकरीचा शोध सुरू केला. जेट एअरवेजमध्ये फ्लाइट अटेंडंट पदासाठी अर्ज केला. पण निवड झाली नाही. अनेकदा मॉडेलिंगमध्येही रिजेक्ट झाल्या. अखेर मॅक्‍डॉनल्डस्मध्ये नोकरी स्वीकारली. तीन मिहने वेटर, स्वच्छतेचे कामही केले.
पुढे वाचा... सुरुवातीला टिव्हीवरही मिळाले अपयश