आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणींनी रायबरेलीत आयआयआयटी आणावे, प्रियंका गांधींचे स्मृती इराणी यांना प्रत्युत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायबरेली - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघात यूपीए सरकारच्या कार्यकाळात आयआयआयटी संस्था का स्थापन करण्यात आली नसल्याचा सवाल मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केला. त्यावर प्रियंका गांधी यांनी इराणी यांना तुम्ही मनुष्यबळ विकासमंत्री आहात तर ही संस्था का स्थापन करत नाहीत, अशी विचारणा केली आहे.

तरुणांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. इराणी यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालय आहे. त्यामुळे त्या या विषयात का लक्ष घालत नाहीत, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला. स्मृती इराणी यांनी मंगळवारी एक दिवसाच्या अमेठी आणि रायबरेलीच्या दौऱ्यात गांधी-नेहरू कुटुंबावर टीका केली होती. अनेक वर्षांच्या आश्वासनांनंतर विकासकामांना लवकरच सुरुवात होईल, असे त्या म्हणाल्या.

आजी-आजोबांनी आश्वासन दिल्यानंतर आता राहुलही आश्वासने देत आहेत. मात्र, येथील लोकांना रेल्वेमार्गाची सुविधा अद्याप मिळाली नाही. हे काम लवकरच सुरू होईल, असे इराणी यांनी सांगितले. सोनिया गांधी रायबरेलीचे प्रतिनिधित्व करत आहेत, तर राहुल गांधी अमेठीचे खासदार आहेत. प्रियंका गांधी यांनी रायबरेलीमध्ये महिलांशी संवाद साधला.
बातम्या आणखी आहेत...