आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथी पास लेडी डॉन, महिन्याकाठी कमवते 50 लाख; बेरोजगार पतीला सुरु करून दिला बिझनेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- डोक्यावरून पदर घेतलेली महिला शहरातील पोलिस ठाण्यात येते. ठाण्यात एकदम शांतता पसरते. खुर्चीवर बसण्याआधी ती पोलिस अधिकार्‍याची परवानगी घेते. या महिलेकडे पाहून ती मारवाडमधील मादक पदार्थ 'डोडा पोस्त'ची सर्वात मोठी तस्कर आहे, हे कोणालाही वाटणार नाही. या महिलेचा इतका दरारा आहे की, परिसरातील सर्व तस्कर तिला टरकतात.
ती केवळ चौथी पास आहे पण महिन्याकाठी 50 लाख रुपयेे कमवत असल्याचे ऐकूून तर पोलिसही थक्क झाले.

कधी भाड्याच्या घरात राहात होती; महिन्याकाठी कमवते 50 लाख रुपये...
- सुमता ऊर्फ समता विश्नोई असे या लेडी डॉनचे नाव. 6 वर्षांपूर्वी ती बेरोजगार पतीसोबत जोधपूरमध्ये अत्यंत हलाखीचे जीवन जगत होती.
- पार्श्वनाथ कॉलनीच्या बाहेर बेघर वस्तीत भाड्याच्या घरात राहात होती. यादरम्यान तिची ओळख दारु तस्कर राजूराम याच्यासोबत झाली. राजूरामचा थाटबाट पाहून तिने जवळीकता वाढवली.
- हळूहळू ती जोधपूर तसेच बाडमेर, जैसलमेरच्या इतर तस्करांच्या संपर्कात आली.
- त्याच्यासोबत तिने दारुची तस्करी करू लागली. काही तस्कर तुरुंगात केल्यानंतर परिसरातील इतर तस्करांनी सुमता यांना आपला प्रमुख मानले.

नातेवाईकांनाही दिले तस्करीचे काम...
- सुमता आणि राजूराम विश्नोईने नेटवर्क वाढवण्यासाठी आपल्या नातेवाईकांनाही तस्करीच्या कामाला लावले.
- सुमताने पती राजूराम भादूला बंगळुरुमध्ये ट्रॅक्टर आणि ट्रक देऊन ट्रान्सपोर्टचा बिझनेस सुरु करुन दिला.

सुमतासह 6 आरोपींना 5 दिवसांचा रिमांड...
- सुमतासह तिच्या सहा साथीदारांना पोलिसांनी बुधवारी कोर्टात हजर केले. कोर्टाने सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कधी राहायची भाड्याच्या घरात, आज राहाते 4 कोटींची इमारत...
- कधी भाड्याच्या घरात राहाणारी सुमता आज 4 कोटींच्या आलिशान वाड्यात राहाते.
- ती दोन दिवसांत दोन ते तीन क्विंटल डोडा पोस्त सप्लाय करत होती.
- तिला या कामातून 3 लाख रुपये नफा मिळत होता. अवघ्या एक वर्षात तिने प्रतिमहिना 45 ते 50 लाख रुपये कमावले.
- तिचे दोन्ही मुले शहरातील नामावंत कॉनव्हेंट स्कूलमध्ये शिकतात. ब्लॅकमनीला व्हाइट करण्यासाठी मुलाच्या नावाने कन्स्ट्रक्शन कंपनी सुरु केली आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, 400 Km स्वत: ड्राईव्ह करत होती सुमता.....
बातम्या आणखी आहेत...