चेन्नई- फ्लिपकार्ट आणि अॅमॅझोनच्या युगात वावरत असताना ई-कॉमर्स पोर्टल स्नॅपडेलने शनिवारी 27, 28 जुलै रोजी इलेक्ट्रॉनिक्स सेलची घोषणा केली असून इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंवर 70% पर्यंत सुट देण्यात येणार आहे. स्नॅपडेलने सांगितले, की सेलच्या वेळी ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंवर 70% डिस्काउंट देण्यात येणार आहे. तसेच सर्व ब्रँडवर एक्सक्लुझिव ऑफरही देण्याात येणार आहे. यात यांगितले आहे, की सेलमध्ये ग्राहकांना मोबाईल, टॅबलेट, कॅम्प्युटर आणि लॅपटॉपवर प्रत्येक तासाला ऑफर देण्यात येणार आहे.
स्नॅपडेलने सांगितले आहे की, या सेलमध्ये डिजिटल एसएलआर कॅमेरावर 18,000 रूपयांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. निवडक फ्री रजिस्टर्ड ग्राहकांना 19,000 रूपयांपर्यंत मोफत ऑफर दिली जाणार आहे. स्नॅपडेलचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट (इलेक्ट्रॉनिक्स अॅंड होम) टॉनी नविनने सांगितले की, सेलला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. या सेलमध्ये सात लाखांपेक्षा अधिक इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्टस्, निवडक ब्रँड वॉरंटी आणि दुस-या दिवशी डिलेव्हरी केली जाणार असल्याची हमी दिली आहे.
ई-कॉमर्समधील अग्रेसर फ्लिपकार्टने अशा प्रकारचा सेल लावला होता. अॅमॅझोनने 21 व 22 जुलै रोजी इलेक्ट्रॉनिक्स सेल लावले होते. स्नॅपडेलमध्ये सॉप्टबॅक, ब्लॅकरॉक, इबे, प्रेम इन्व्हेस्टर आणि रतन टाटा यांनी गुंतवणुक केली आहे.