आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडलिंग करतोय हा किन्नर, पवनकुमार बनून झाली स्नेहाच्या आयुष्याची सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- बदलत्या समाजासोबतच लोकांचे विचारातही बदल होतोय. भारतात तृतियपंथीयांकडे (किन्नर) लोकांचा पाहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक झाला आहे. तिसर्‍या जेंडरचा (लिंग) दर्जा मिळाल्याने ही मंडळी आता विविध क्षेत्रात स्वत:चा ठसा उमवताना दिसत आहे. काहीशी अशीच आहे राजस्थानची स्नेहा शर्माची स्टोरी...
काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या पहिल्या ट्रान्सजेंडर मॉडलिंग ऑडिशनमध्ये स्नेहा फायनलपर्यंत मजल मारली होती. आता तिच्यासाठी मॉडलिंगची अनेक कवाडं खुली झाली आहेत. तिच्याकडे अनेक कंपन्यांच्या ऑफर्स आहेत.

मुलाच्या रुपात झाली स्नेहाच्या आयुष्याची सुरुवात...
- स्नेहाच्या आई-वडिलांना मुलगा हवा होता. परिणामी स्नेहाच्या आयुष्याची सुरुवात पवनकुमार या नावाने झाली.
- अजमेरमध्ये लहानाची मोठी झालेल्या स्नेहाने महर्श्री दयानंद सरस्वती कॉलेजात प्रवेश घेतला.
- चालण्या-बोलण्यावरून मित्र तिची टिंगल उडवत असत. मित्रांच्या असल्या वागण्याला कंटाळून तिने शिक्षण अर्ध्यात सोडून दिल्ली गाठली.
- दिल्लीत ती 'मित्र' नामक ट्रस्टशी जुळली. किन्नरांसाठी ही संस्था काम करते.
- पैशाची चणचण जाणवू लागल्याने स्नेहाने सेक्स वर्कर म्हणूनही काही दिवस काम केले.

डीयूमध्ये प्रवेशासाठी केला अर्ज...
- स्नेहाने मागील वर्षी डीयू अर्थात दिल्ली यूनिव्हर्सिटीच्या भारती कॉलेजमध्ये प्रवेशसाठी अर्ज केला होता.
- बीएची पदवी घेण्याची तिची इच्छा होती. प्रवेश मिळवण्यासाठी तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
- डीयूने ट्रान्सजेंडरसाठी प्रवेश अर्जावर 'Other' कॅटेगरीचा पर्यायही दिला होता.

मॉडलिंगमध्ये केले करियर...
- 4 महिन्यांपूर्वी पहिल्या ट्रान्सजेंडर मॉडलिंग ऑडीशनमध्ये स्नेहाची निवड झाली होती.
- स्नेहा सध्या मॉडलिंग एजन्सीमध्ये काम करते. ट्रान्सजेंडर अॅक्टिविस्ट रुद्रानी चेत्री ही ही एजन्सी चालवते.
- रुद्रानीने खुद्द अनेक मॉडलिंग असाइनमेंट पूर्ण केल्या आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा, पवनकुमार बनून आयुष्याची सुरुवात झालेल्या स्नेहाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...