आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Snow, Rain News In Marathi, Snow And Rain Falling Issue In North India, Divya Marahti

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐन हिवाळ्यात उत्तर भारतात बर्फवृष्टी, पावसाची हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगढ,सिमला - उत्तर भारतातील अनेक भागाला लहरी हवामानाचा फटका बसला आहे. पंजाब, हरियाणात शनिवारी सलग दुसर्‍या दिवशी पाऊस झाला,तर हिमाचल प्रदेशच्या सिमला,मनालीत व काश्मीर, उत्तराखंडमध्ये प्रचंड बर्फवृष्टी झाली.
चंडीगढमध्ये सकाळी 18.9 मिमी पाऊस झाला. येथे किमान तापमान 10.4 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले.अमृतसर येथे 8 डिग्री तापमान होते.लुधियाना,पतियाळा येथेही भरपूर पाऊस झाला.हरियाणाच्या अंबाला शहरात 15.8 पाऊस झाला.
तापमान 10 डिग्री सेल्सियसपर्यंत घसरले होते, तर हिसार व करनाल येथेही पाऊस झाला. हिमाचल प्रदेशातील पर्यटनाची ठिकाणे असलेल्या सिमला आणि मनाली येथे शनिवारी बर्फवृष्टी झाली.
सिमल्याच्या मालरोड,रिज व जाखू पर्वतावर बर्फाची चादर पसरली होती.कसौली,डलहौसी येथेही जोरदार बर्फ पडला. कुलू-मनाली राष्ट्रीय महामार्ग मनालीपासून 20 किलोमीटर अलीकडेच बंद करावा लागला.
काश्मिरात दरडी कोसळल्या : दक्षिण काश्मीरच्या पहलगामसह खोर्‍यातील अनेक भागात बर्फवृष्टी झाली. पहलगाम येथे 4.8 सेंटिमीटर बर्फ पडला, तर पारा उणे 2.2डिग्री सेल्सियसपर्यंत खाली घसरला.श्रीनगर, गुलर्मग येथेही तापमान गोठन बिंदूच्या खाली घसरून उणे नोंदवले गेले. श्रीनगर-जम्मू काश्मीर महामार्गावरील वाहतूक मात्र सुरळीत सुरूआहे. डोडा येथे बर्फाची दरड कोसळून एक जण ठार झाला. उत्तराखंडमध्येही अनेक ठिकाणी गारा पडल्या. उत्तरकाशी, चमोली,नैनिताल येथे सलग दुसर्‍या दिवशी बर्फ पडत होता.
ब्रिटनमध्ये वादळ, 2 ठार
ब्रिटनमध्ये वादळाचे थैमान सुरूच असून शनिवारी वादळात दोन जण ठार झाले.रविवारीही सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य लंडनमध्ये एक दगडी इमारत कोसळून मध्यमवयीन टॅक्सीचालक ठार झाला, तर इंग्लिश खाडीत जोरदार लाटेच्या तडाख्यात सापडून एक 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिक ठार झाला. ब्रिटनच्या सेंट, सरे आणि ससेक्स परगण्यातील 11 हजार घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. थेम्सनदी पुन्हा रुद्रावतार धारण करू शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पंजाब,हरियाणात पावसाच्या सरी
हिमाचल, काश्मीर, उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी