आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एडवर्ड स्नोडेनला क्‍युबाच्‍या राओल कॅस्ट्रोंची राजाश्रय देण्‍याची तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवाना - क्युबाचे राओल कॅस्ट्रो यांनी लॅटिन अमेरिकी देशांच्या खांद्याला खांदा लावून एडवर्ड स्नोडेनला राजाश्रय देण्याची ऑफर दिली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचा (एनएसए) माजी काँट्रॅक्टर स्नोडेनला राजाश्रय देण्याची तयारी दाखवली आहे. परंतु कॅस्ट्रो यांनी यासंबंधीची नेमकी तारीख किंवा स्नोडेनच्या सुरक्षेची योजना मात्र जाहीर केली नाही.

अगोदर व्हेनेझुएला व बोलिव्हिया या देशांनी गेल्या आठवड्यात राजाश्रय देण्याची तयारी दर्शवली होती. निकारागुआनेही स्नोडेनसंबंधी सकारात्मक संकेत दिले होते. इतर देशांच्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे, असे कॅस्ट्रो यांनी स्पष्ट केले. क्युबाच्या संसदेतील भाषणात त्यांनी देशाची भूमिका मांडली. दरम्यान, स्नोडेन मॉस्कोच्या विमानतळावरून गायब झाल्यासारखी स्थिती आहे.