आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिमाचलमध्‍ये हंगामातील पहिली हिमवृष्‍टी, काश्‍मीरमध्‍ये पारा सरासरीपेक्षा 3 अंशाने कमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिमाचलमध्‍ये लाहौल-स्‍पाती, मनाली, किन्‍नौर येथे जोरदार हिमवृष्‍टी झाली आहे. - Divya Marathi
हिमाचलमध्‍ये लाहौल-स्‍पाती, मनाली, किन्‍नौर येथे जोरदार हिमवृष्‍टी झाली आहे.

शिमला- हिमालच प्रदेशमध्‍ये शनिवारी या हंगामातील पहिली हिमवृष्‍टी झाली. लाहौल-स्‍पातीमधील केलॉन्‍गमध्‍ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. 2 अंश सेल्‍सीअसपर्यंत येथील तापमान कमी झाले आहे. दुसरीकडे काश्‍मीरमध्‍ये दुस-यादिवशीही हिमवृष्‍टी सुरु होती. यामुळे काश्‍मीरमध्‍ये मुगल रोड बंद करण्‍यात आला आहे. 


हिमाचलमध्‍ये पारा शुन्‍याच्‍या खाली 
- वृत्‍तसंस्‍थेने दिलेल्‍या माहितीनूसार हिमालचमध्‍ये शुन्‍य अंश सेल्सिअसखाली तापमान गेले आहे. 
- किन्‍नोरमधील कल्‍पा येथे 0.6 अंश सेल्सिअस, मनाली येथे 1.6 तर शिमल्‍याला 5.9 अंश तापमानाची नोंद करण्‍यात आली आहे. 


जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये दिवसाच्‍या तापमानात घट 
- जोरदार हिमवृष्‍टीमुळे जम्‍मुकाश्‍मीरचे दिवसाचे तापमान तब्‍बल 6 अंश सेल्सिअसने घसरले आहे. 
- हंगामातल्‍या पहिल्‍या हिमवृष्‍टीमुळे जम्‍मूमधील मुगल रोड बंद करण्‍यात आला आहे. जम्‍मूकाश्‍मीरसाठी हा रोड अत्‍यंत महत्‍त्‍वाचा आहे. कारण याच रोडद्वारे जम्‍मूकाश्‍मीर देशाशी जोडले जाते. 
- डीएसपी ट्रॅफिक अधिकारी मोहम्‍मद असलम यांनी सांगितले की, 'पीर की गल्‍ली या भागात रस्‍त्‍यावर बर्फ जमा होत असल्‍यामुळे वाहतुक बंद करण्‍यात आली आहे. रस्‍त्‍यावरुन बर्फ हटवण्‍याचे काम सुरु आहे. पुढेही हे काम सुरु राहिल की नाही, हे हवामानावर अवलबूंन राहिल.' 

 

काश्‍मीरमध्‍ये 2 फुट हिमवृष्‍टी 
- काश्‍मीरमध्‍ये पीर की गल्‍ली ते पुशाना या भागात तब्‍बल 2 फुटांपर्यंत हिमवृष्‍टी झाली आहे. 
-15 नोव्‍हेंबर ते आतापर्यंत किश्‍तवाड- अनंतनाग रस्‍त्‍यावर 3 फुटांपर्यंत हिमवृष्‍टी झालेली आहे. 
-जम्‍मूमध्‍ये तापमान 9.5 अंशापर्यंत कमी झाले आहे. सामान्‍य तापमानापेक्षा हे प्रमाण 3 अंश सेल्सिअनने कमी आहे.
- दुसरीकडे हिमवृष्‍टीमुळे सोनमर्ग येथे पर्यटक गर्दी करत आहेत.  


पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

 

 

बातम्या आणखी आहेत...