आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 वर्षांनंतर सिमल्यात पहिल्यांदाच व्हाइट ख्रिसमस, बघा गारठून टाकणारे Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिमला (हिमाचल प्रदेश)- 1991 नंतर पहिल्यांदाच 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसला सिमल्यात हिमवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही हिमवृष्टी झाली नाही तरी सिमल्याला जाणाऱ्या पर्यटकांना यंदाच्या ख्रिसमसमध्ये पहिल्यांदाच बर्फच्छादित परिसराचा आस्वाद घेता येणार आहे. या रविवारी सिमल्यात झालेल्या हिमवृष्टीमुळे येथील तापमानात कमालिची घट झाली असून पर्तवतांची शिखरे बर्फाने माखून निघाली आहेत.
सिमल्यातील हिमवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी ख्रिसमसची वाट बघतील ते अस्सल पर्यटक कसले. रविवारी हिमवृष्टी झाल्याचे वृत्त धडकताच सिमल्याच्या दिशेने जाण्यास पर्यटकांनी सुरवात केली आहे. एव्हाना काही पर्यटक तेथे पोहोचले असून हिमवृष्टीचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.
हिमवृष्टीमुळे येथील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. सिमला 0.2, चंबा 0.1, मनाली -1.2, कल्पा -3.0, केलांग -4.0, धर्मशाळा 7.2 सोलन 5.0 आणि नाहन येथे 3.6 डिग्री सेल्सियस तापमान आहे.
सिमल्यातील हिमवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...