आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Snowfall In Jummu Kashmir And Change In Central India

जम्मू काश्मीरमध्ये तूफान हिमवृष्‍टी; मध्य भारतात मात्र चढला पारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/शिमला/जम्मू- जम्मू-काश्मीरसह हिमाचल प्रदेशात तूफान हिमवृष्‍टी सुरु आहे. हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काश्मीरमध्ये नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्‍यात आले आहे. दुसरीकडे, मात्र उत्तर व मध्य भारतातील अनेक राज्यात शनिवारी पारा चढल्याचे दिसून आले.

रायपूरमध्ये 33.5 अंश सेल्सिअस तर चंडीगडमध्ये मागील नऊ वर्षानंतर शनिवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.

जम्मूमध्ये वाहतूक ठप्प, अलर्ट जारी
- जम्मू-काश्मीरमधील एलओसीजवळीत केरान, करनाह व माचिलला जोडणारा महामार्ग ठप्प झाला आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी बर्फ साचला आहे. अपघात होऊ नये म्हणून महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- माचिलमध्ये जवळपास तीन फूट, सधाना टॉपमध्ये चार फूट तर जी-गलीमध्ये पाच फूट बर्फ साचला आहे.
- दुसरीकडे, जानेवारी महिन्यात मागील नऊ महिन्यांनंतर शनिवारी मध्य भारताने ऐन हिवाळ्यात उकाडा अनुभवला. 8 जानेवारी 2008 ला 26.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
- 30 जानेवारीला 25.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
- मध्यप्रदेशातील भोपाळ व इंदूरमध्ये शनिवारी तापमान 15 अंश सेल्सिअस होते.ऊ

राजस्थानात ऐन हिवाळ्यात अनुभवला उन्हाळा...
राजस्थानातील लोकांना ऐन हिवाळ्यात उन्हाळा अनुभवला. बाडमेर व उदयपूरमध्ये शनिवारी 30 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुसरीकडे, कोटामध्ये तापमान 17 अंश सेल्सिअसच्या वर होते.

देशातील प्रमुख शहरांचे शनिवारचेतापमान (अंश सेल्सिअमध्ये)
शहरकिमानकमाल
भोपाळ14.431.8
जयपूर13.929.3
रांची
12.4
29.2
रायपूर
15.533.5
चंडीगड
11.222.7
पानीपत
1224
इंदूर
1532.1
दिल्ली
13.227.2
पाटणा1125.4
पुढील स्लाइडवर पाहा, जम्मू-काश्मीरमधील हिमवृष्‍टीचे फोटो...