आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिमल्यात हिमवृष्टी झाल्यामुळे परिसरात थंडीची लाट पसरली आहे. गुरुवारी सकाळीही काही वेळ हिमवृष्टी झाल्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. कोटखाई आणि खडा पत्थर येथे भाविकांनाही असुविधा सहन करावी लागली. सिमल्यात याचा प्रभाव दळणवळणावर जाणवला.
सिमल्यात पोहोचलेलल्या पर्यटकांनीही हिमवृष्टीचा आनंद घेतला. कुफरी, नारकंडा याठिकाणीही पर्यटकांनी गर्दी केली होती. सगळीकडे बर्फ पसरलेला असताना पर्यटकांनी याचा आनंद घेतला. नारकंडामध्ये पर्यटकांनी स्केटिंगची मजा लुटली. आठ फेब्रुरवारीला पुन्हा हिमवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. हिमवृष्टी सुरू झाल्याने शेतकरी वर्गही सुखावला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.