आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगींना भेटण्यापूर्वी साबण-शॅम्पूने अंघोळ करून या, दलितांना प्रशासनाचे फर्मान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ येण्याआधी कुशीनगरातील रहिवाशांना प्रशासनाकडून साबण आणि शॅम्पूने अंघोळ करण्याचा सल्ला देण्यात आला. प्रशासनाकडून महिलांना साबण, सेंट आणि शॅम्पू देण्यात आले.
 
प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दलित वस्तीतील लोकांना सांगितले, मुख्यमंत्र्यांना भेटायचे असेल तर अंघोळ करून पावडर लावून भेटावे. मुख्यमंत्र्यांसमक्ष त्यांनी स्वच्छ चांगल्या कपड्यात दिसले पाहिजे, अशा त्यांच्या सूचना होत्या. गोरखपूरचे खासदार होते तेव्हा ते नेहमी मागासवर्गीयांच्या विकासावर भाष्य करत असत. यामुळे गावात लसीकरणांची मोहीम राबवण्यात आली. त्यांच्या हस्ते पाच मुलांना लसीकरण देऊन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. त्यांना कुशीनगरातील मैनपूर कोट, दीनापट्टी गावातील मागासवर्गीय विभागात जायचे होते. पण त्यांचा दौरा रद्द झाला. दलित वर्गात जेथे त्यांना जेवणही धड मिळत नाही की, त्यांच्या अंगावर धड कपडे नीट नसतात. अशा वर्गात प्रशासनाने शॅम्पू साबण वाटले.
 
शहिद जवानाच्‍या कुटुंबियासोबतही अशाच प्रकारची घटना
याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देवरियाला एका शहीद जवानांच्या घरी गेले होते. तेव्हा योगी तेथे जाण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी सोफा, एसी गालिचा अंथरला हाेता. त्यांचा दौरा संपताच सर्व वस्तू परत नेण्यात आल्या.
 
दिनापट्टी गावातील दयाराज याने सांगितले, योगी येणार असल्याने स्वच्छ अंघोळ करून तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. आम्ही लोक तेथे गेलो होतो, पण साबणाचे वाटप नंतर झाले. अंगणवाडी कार्यकर्तीने साबण दिला होता, असे किशुनदेवीने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...