आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media Criticize Novelist Chetan Bhagat On Half Girlfreind

\'हाफ गर्लफेंड\'मुळे लेखक चेतन भगत यांच्यावर सोशल मिडियामधून टीकाकारांचा हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चेतन भगत यांचे नवे नॉव्हेल 'हाफ गर्लफ्रेंड' लाँच झाल्यानंतर काही दिवसांतच सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर टीकाकारांनी हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. हे इंग्रजीत लिहिण्यात आलेले 'हिंदी पुस्तक' असल्याची टीका सध्या होत आहे. विशेष म्हणजे पुस्तकातील भाषेवरूनही सोशल मिडियावर अत्यंत वाईट पद्धतीने टर उडवली जात आहे. त्यातही नॉव्हेलमध्ये वापरण्यात आलेल्या 'देती है तो दे वरना कट ले' या हिंदी वाक्यावरही सर्वाधिक टीका केली जात आहे.
हे नॉव्हेल चेतन भगत यांनी 1 ऑक्टोबरला लाँच केले होते. या पुस्तकावर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणार याचा अंदाजही भगत यांना आधीपासूनच होता. चेतन यांनी पुस्तक लाँचिंगच्या एक दिवस आधी ट्वीट केले होते की, ''एकच दिवस शिल्लक आहे. आता टीकाकारांसाठी चांगली वेळ येणार आहे." या ट्वीटद्वारे चेतन यांनी टीकाकारांना सौम्य पद्धतीने टीका करण्याचे आवाहन केले होते.
जे शब्द वापरले त्यांचा भारतात होतो वापर
'हाफ गर्लफ्रेंड' चा हिरो बिहारचा एक तरुण आहे. तो देशातील सर्वात मोठ्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतो. पण त्याला इंग्रजी येत नसते. त्याच कॉलेजमधील एका मुलीवर त्याचे प्रेम जडते. तिला चांगली इंग्रजी येत असते. ऩव्हेलमध्ये वापरण्यात आलेल्या इंग्रजी भाषेबाबत चेतन सांगतात की, त्यांनी हिरोसाठी ज्या इंग्रजी भाषेचा वापर केला आहे, तशा भाषेचा वापर हा भारतात केला जातो.
पुढील स्लाइडवर, पाहा चेतन भगतने केलेले ट्वीट