आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Social Networking Site Only For Child, Still Now 20 Thousand Child Netzans

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘फक्त मुलांसाठी’ सोशल नेटवर्किंग साइट, आतापर्यंत 20 हजार मुले नेटिझन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - ‘फक्त प्रौढांसाठी’ ‘फक्त महिलांसाठी ’सिनेमा,नाटक,वेबसाइट झाले.मग ‘फक्त मुलांसाठी’ का नको असा विचार बच्चे कंपनीच्या मनात नेहमीच येतो. त्यामुळेच आता केवळ मुलांसाठीच सोशल नेटवर्किंग साइट उपलब्ध झाली आहे.


भारतातील 6 ते 12 वर्षे वयाच्या मुलांसाठी Worldoo.com ही सोशल नेटवर्किंग साइट एप्रिलमध्ये सुरू करण्यात आली असून आतापर्यंत 20 हजारांहून अधिक मुलांनी त्यावर नोंदणी केली आहे.


वर्ल्डडू डॉट कॉमच्या एक्सपिरियन्स व ब्रॅँड विभागाचे प्रमुख हर्षवर्धन दवे म्हणाले, मुलांच्या सुरक्षेसाठी व त्यांना त्रास वा छळ होऊ नये यासाठी साइटवर सुरक्षेचे अनेक उपाय योजले आहे. नोंदणीसाठी पालकांची परवानगी आवश्यक आहे. मुलांच्या चॅटिंग व इतर वापरावर बेबसाइटची कायम निगराणी असेल. वेबसाइटवर वैयक्तिक माहिती व छायाचित्र अपलोड करण्यास मनाई आहे.


13 वर्षांखालील मुलांकडून वेबसाइटचा गैरवापर होत असेल तर त्यांच्यावर नियंत्रण कसे घालणार याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने दोन कंपन्यांकडे विचारणा केली आहे.


घाणेरड्या शब्दानंतर इशारा
वेबसाइटवर घाणेरडा शब्दप्रयोग रोखला जातो. जी मुले शब्दांचा योग्य वापर करत नाहीत, त्यांना ‘बीविंग’द्वारे इशारा दिला जाईल. एक ते दोन वेळा इशारा दिल्यानंतर युजर्सना साइटचा अ‍ॅक्सेस बंद होतो.


27 % मुलांचा नेटचा वापर
देशातील 27 टक्के मुले कॉम्प्युटर किंवा मोबाइलमार्फत इंटरनेटचा वापर करत असल्याचे एका सर्वेक्षणात पुढे आले आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने केलेल्या अभ्यासात इंटरनेटवरील घातक सामग्रीशी देशातील 40 लाख मुलांचा संबंध आल्याचे म्हटले आहे.


अमर चित्रकथा, चंपक
वर्ल्डडू वेबसाइटचे मिनिक्लिप, गेमबॉक्स आणि झपाक, कार्टून नेटवर्कसोबत टायअप असून युजर्सना छोटा भीमचा अ‍ॅक्सेस मिळेल. मुलांना अमर चित्रकथा, क्रॉसवर्ल्ड, लॅँडमार्क, ड्रीमलॅँड, ब्रिटानिया बुक्स, चंपक आदी मासिकातील कथा वाचता येतील.