आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रथमच उजळणार ४०० गावे, सौर ऊर्जेने सव्वा लाख घरात येणार वीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चक्रधरपूर - पश्चिमी सिंहभूम जिल्ह्यातील सारंडा सर्कलमधील नक्षलप्रभावित पाच गटांतील (ब्लॉक) ४०० गावांत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घराघरांत वीज जोडणी मिळणार आहे. साधारणत: सव्वा लाख गावकरी पहिल्यांदा विजेचा बल्ब पाहणार आहेत. सौरऊर्जेने हा परिसर उजळणार असून, चक्रधरपूर, अनुमंडळच्या गुदडी, गोईलकेरा, बंदगाव, आनंदपूर व सोनुवा गटातील या गावांमध्ये आजमितीस रॉकेलवर जळणार्‍या दिव्याने घर उजळते आहे. शतकानुशतके अंधारात खितपत पडलेल्या या लोकांसाठी झारखंड सरकार २० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. गुदडीत ८७.५ एकर जमिनीवर पोडाहाट डेव्हलपमंेट अ‍ॅक्शन प्लॅनअंतर्गत उभारल्या जाणार्‍या प्रकल्पासाठी अधिग्रहित जमीन झारखंड ऊर्जा विकास महामंडळाला नुकतीच मिळाली असून, प्रशासकीय अधिकार्‍यांच्या माहितीनुसार प्रकल्पावर लवकरच काम सुरू होणार आहे. वर्ष २०१७ पर्यंत प्रकल्प पूर्णपणे तयार होईल.
असा होणार नक्षली भागाचा विकास
ओबडधोबड डोंगराळ नक्षलप्रभावित या प्रदेशात रात्री शस्त्रसज्ज फिरणार्‍या नक्षलवाद्यांच्या धमकीला न जुमानता व दिवसा त्यांना शोधणार्‍या पोलिसांच्या बुटांच्या आवाजाच्या दहशतीत जगणार्‍या या खेडुतांना आशेचा किरण दिसला. विकासासाठी सरकारने पोडाहाट अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला. याअंतर्गतच गुदडी गटात सौर ऊर्जा प्रकल्पाशिवाय रस्तेही होणार. इंडियन रिझर्व्ह बटालियन तैनात होईल. त्यांच्या ठाण्याची इमारतीसह त्यांचा कॅम्प राहील. १६ एकर जमीन शैक्षणिक संस्थांसाठी, ३.५० एकर जमिनीवर ठाण्यासह ब्लॉकच्या गटाच्या कार्यालयाची इमारतही होणार आहे. एवढेच नव्हे, तर आयुष मेडिकल कॉलेजदेखील येथे उभारण्याची योजना आहे.