आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे डब्यांच्या छतावर लावणार सोलार पॅनल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - रेल्वेच्या डब्यातील लाइट व पंखे चालवण्यासाठी आता कोचच्या छतावर सोलार पॅनल लावण्यात येणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेलची बचत होणार असून तोट्यातील रेल्वेला चांगला लाभ पदरात पडणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये त्यासाठीचा एक पायलट प्रोजेक्ट जोधपूर येथील कार्यशाळेत सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात डीएमयू रेल्वेच्या ५० कोचवर ६०० पॅनल बसवण्यात येणार आहेत. एका कोचवर ३००
वॅटचे एकूण १२ पॅनल लावण्यात येणार आहेत. या पायलट प्रकल्पावर १.९५ कोटी रुपये खर्च येणार आहे.

सौर ऊर्जेच्या पॅनलचे हे मॉडेल आयआयटी चेन्नई येथे तयार करण्यात आले आहे. रेल्वेच्या कार्यशाळेचे उपमुख्य मेकॅनिकल इंजिनिअर एस. व्ही. यादव यांनी ही माहिती िदली. त्यांनी सांगितले की, मागील दोन वर्षांपासून विचार केल्यानंतर आता रेल्वे बोर्डाने याच्या पायलट प्रकल्पाला मंजुरी िदली आहे. या प्रकल्पाअंतर्गत सध्या दिवसा चालणा-या डीएमयू कोचमध्ये हे पॅनल बसवण्यात येणार आहेत. त्यानंतर रातराणी गाड्यांमध्ये बॅटरीच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मेल, एक्स्प्रेस व सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांमध्ये असे कोच बसवण्यात येणार आहेत.

ट्रेनमुळे वाचणार ९० हजार लिटर डिझेल
गेल्यावर्षी आयआयटी बंगळुरूने रेल्वेमध्ये सौर ऊर्जेच्या उपयोगासाठी संशोधन केले होते. त्यासाठी एक रेल्वे निवडण्यात आली होती. यात पाच एसी कोच, १२ इतर श्रेणीचे कोच तसेच पँट्री कारचा समावेश होता. . प्रयोगात असे आढळून आले की एका वर्षात २० कोचच्या ट्रेनने जवळपास १८८ फे-या केल्या. त्यातून वीज तयार करण्यासाठी ९० हजार लिटर डिझेल खर्च झाला. शिवाय २४० टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी झाले.