आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-चीन सीमेवर जवानांची योगसाधना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुटी (चीन सीमा) - आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत-चीन सीमारेषेवर तैनात निमलष्करी दलाच्या जवानांनी १८ हजार फूट उंचीवर योग केले. सुमारे २ ते ५ अंश तापमानात सशस्त्र सीमा दल तसेच आयटीबीपीएफने हिमालयाच्या बर्फाच्छादित प्रदेशात याचे आयोजन केले होते.

शनिवारी कैलास दर्शनानंतर रविवारी सशस्त्र सीमा दल आणि इंडो तिबेटियन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी संयुक्तपणे योग दिन साजरा केला. दरम्यान, ६ जूनपासून कैलास मानसरोवर यात्रेस प्रारंभ झाला आहे. कैलास यात्रा चीनच्या सीमेवरील उत्तराखंडमधील पिथोरगड जिल्ह्यात पार पडते. धारचुला येथून सुमारे १०० किलोमीटरपर्यंत या ठिकाणी पायीच चढाई करावी लागते. सशस्त्र सीमा दलाची एक तुकडी १५ जून रोजी गोठी (धारचुला) येथून कैलास यात्रेच्या दिशेने रवाना झाली आहे. माउंटेनियरिंग एक्सपेडियनसाठी निघालेल्या या तुकडीस एसएसबी राणीखेत मुख्यालयाचे महानिरीक्षक शामसिंग यांनी हिरवी झेंडी दाखवली. या अभियानाचे नेतृत्व द्वितीय कमिटंट संजय शेरखाने यांनी केले.

या वेळी शेरखाने म्हणाले की, हिमालयात अतिउंचावर सकाळी व्यायाम करणे शक्य नसते. अशा वातावरणात योग केल्याचा फायदा होतो. याप्रसंगी संतोष कंवर शेखावत, उपमहानिरिक्षिक पी.एस.मेहरा, कमांडंट राजेश ठाकूर, मानवेंद्र नेगी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...