आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या गोळीबारात महिला ठार, ३ जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - पाकिस्तानने बुधवारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात जम्मू जिल्ह्यातील अखनूर भागात एक महिला ठार तर तीन जण जखमी झाले. जखमींमध्ये बीएसएफच्या एका जवानाचाही समावेश आहे.

बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अखूनर तहसीलमधील कनाचक येथे चौकीचे रक्षण करणाऱ्या बीएसएफचा जवान अंजलीकुमार याच्यावर पाकिस्तानी रेंजर्सनी सकाळी पावणेनऊ वाजता गोळीबार केला. इतर सहकारी त्याला एका वाहनातून नेत असतानाच त्यांच्यावरही जोरदार गोळीबार करण्यात आला. बीएसएफच्या जवानांनीही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले.
राज्याचे माजी अर्थमंत्री गिरधारीलाल डोग्रा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित समारंभाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ जुलैला जम्मूच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वीच पाकिस्तानने पुन्हा कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. या महिन्यात पाक लष्कराने नऊ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

नागरी वस्त्यांवरही केला गोळीबार
पाकिस्तानी रेंजर्सनी भालवाल भार्त, मालाबेला, सिदरवान या नागरी भागांवर तसेच एका चौकीवरही सकाळी ९.१० वाजता लहान शस्त्रास्त्रांनी तसेच मॉर्टब बॉम्बने हल्ला केला. तीन तोफगोळे कनाचक येथे पडले. त्यात पोलीदेवी ही ४२ वर्षीय महिला ठार झाली, तर रमेशकुमार (२४) आणि उधा देवी (३८) हे दोघे जखमी झाले.
बातम्या आणखी आहेत...