आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रावर शोककळा: कोल्हापुरच्या जवानाचा हिमवृष्टीत मृत्यू तर साताऱ्याचा जवान शहीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- लेहमधील दराज येथे एका भारतीय जवानाचा हिमवृष्टीत गुदमरुन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महादेव तुपारे असे शहीद जवानाचे नाव आहे. महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यातील महिपाळगड येथील ते रहिवासी होते. त्यांच्या मृत्युने महिपाळगडसह चंदगड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, पाकिस्तानी रेंजर्सनी पूंछ भागात केलेल्या बेछुट गोळीबारात दीपक जगन्नाथ घाडगे (27) शहीद झाले आहेत.

महादेव तुपारे यांचा हिमवृष्टीमुळे गुदमरुन मृत्यू झाल्याची माहिती सैन्यातील अधिकाऱ्यांनी तुपारे यांच्या कुटुंबियांना दिली. तुपारे यांचा 8 मार्चला मृत्यू झाल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून श्रीनगरमध्ये तुफान हिमवृष्‍टी सुरु आहे.

महादेव तुपारे हे लष्कराच्या 16 कुमाँऊ रेजिमेंटमध्ये 2005 मध्ये भरती झाले होते. सैन्यात ते क्लार्क या पदावर कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून लेह-श्रीनगर भागात प्रचंड बर्फवृष्टी होत आहे. महादेव यांचे पार्थिव त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी लष्कराचे प्रयत्न सुरु आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... पाकिस्तानी जवानांच्या गोळीबारात साताऱ्याचा जवान शहीद

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...