आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूआधी जवानाची अधुरी राहिली इच्छा, शेवटचे पत्नीशी फोनवर म्हणाले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुरुक्षेत्र - जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात एक सैन्य शिबिरात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल कुरुक्षेत्रचे राहणारे चंद्रभान (40) यांची सहकारी जवान रवींद्र सिंहने कथितरीत्या गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, रवींद्रला ताब्यात घेतलेले आहे. 40 वर्षीय चंद्रभान वर्मा 1997 मध्ये बारावीनंतर 20 वर्षे वयातच बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल पदावर भरती झाले. 20 वर्षांची नोकरी आतापर्यंत झालेली होती. तथापि, ते सहा महिन्यांपूर्वीच नोकरी सोडून व्हीआरएस घेऊन घरी परतू इच्छित होते. त्यांना आपल्या मुलांना वेळ देण्याची इच्छा होती, जी अधुरी राहिली.


साडेनऊला आला फोन- म्हणाले होते आपली काळजी घे...
- चंद्रभान यांच्या घरी शोककळा पसरली आहे. पत्नी बीना देवी सारख्या बेशुद्ध होताहेत. इतर महिला आणि कुटुंबीय त्यांना धीर देत आहेत.
- बीना म्हणाल्या की, अनेक दिवसांपासून त्यांना पोटदुखी आहे. रात्री साडेनऊला चंद्रभान यांचा फोन आला. म्हणाले होते की, आपली काळजी घ्या आणि उद्या हॉस्पिटलमध्ये चांगले तपासून घे. त्यांना माहिती नव्हते की, पतीशी हे शेवटचे बोलणे होईल. त्यांचे पती देशासाठी शहीद झाले आहेत.

- चंद्रभान यांचा मुलगा यश 11वीत शिकतोय. तर मुलगी हीना 5 वीत शिकतेय. 
- यश म्हणाले की, पप्पा रोज फोनवर पूर्ण परिवाराशी बोलायचे. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांचा फोन आला, तेव्हा मला म्हणाले होते, बेटा उद्या शाळेतून सुटी घेऊन तुझ्या मम्मीचे अल्ट्रासाउंड करून त्यांना औषध घेऊन दे. सोबतच तुझी आणि हीनाची काळजी घे. 10 मिनिट बोलल्यावर पप्पा म्हणाले होते की, आता मी ड्यूटीवर आहे, उद्या पुन्हा बोलू.

 

वडील म्हणाले- मुलांसोबत त्याला वेळ घालवायचा होता...
- बीएसएफमधून असिस्टंट कमांडंट पदावरून रिटायर्ड 70 वर्षीय वडील हरिचंद म्हणाले की, त्यांच्या मुलाला मुलांसोबत वेळ घालवायचा होता. परंतु तेव्हा त्यांनी नकार दिल्याने व्हीआरएस घेतली नव्हती.
- असे म्हणून ते स्वत:लाच दोष देत राहिले. म्हणाले- चंद्रभान ड्यूटीवर होता, यामुळे जास्त धोका नसल्याने त्यांनी नकार दिला होता.
- त्यांनीच चंद्रभान यांना आणखी काही दिवस नोकरी करण्याचा सल्ला दिला होता. वडिलांना तेव्हा कुठे माहिती होते की, त्यांचा मुलगा तेथून पुन्हा कधीच परतणार नाही. म्हणाले-  म्हातारपणी असा दिवस पाहणे नशिबी आले.
- जवानाचे वडील म्हणाले- जोपर्यंत मी जिवंत आहे- मुलांच्या पालनपोषणात कोणतीही कमी येऊ देणार नाही. पण मी गेल्यानंतर या मुलांचे काय होईल, असे म्हणून ते विचारात पडले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...