आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Soldier Suicide In Front Of Hariyana Secretariat

हरियाणा सचिवालयासमोर माजी सैनिकाने घेतले विष, पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड/साेनिपत- पत्नीच्या अवैध संबंधामुळे एका माजी सैनिकाने बुधवारी हरियाणा सचिवालयातील पार्किंगमध्ये विष घेऊन आत्महत्या केली. खरखौद्याच्या सिसानाचा संदीप हा माजी सैनिक कृषी विभागात सेवक पदावर कार्यरत होता.

सैनिकाच्या खिशात पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. त्यात लिहिल्याप्रमाणे, माझ्या पत्नीचे पोलिसांशी अनैतिक संबंध आहेत आणि तिच्या या कृत्याची शिक्षा माझ्या १५ वर्षीय मुलीला भोगावी लागत आहे. पोलिस तिच्यावरही बलात्कार करत आहेत. मी विरोध केला असता पोलिस मला खोट्या एन्काउंटरमध्ये मारण्याची धमकी देतात. याच प्रकरणाची तक्रार देण्यासाठी मी आज सचिवालयात आलो आहे. परंतु मला सचिवालयात जाऊ देत नाहीत, असेही त्याने चिठ्ठीत लिहिले आहे.

दरम्यान, चंदिगड पोलिस पीडित मुलीचा जबाब नोंदवण्यासाठी सोनिपतला गेले होते. संदीपच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून संदीपची पत्नी आणि अन्य पोलिस कर्मचाऱ्यांविराेधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.