आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी सीमेलगत गरजले भारतीय रणगाडे, 45 अंश सेल्सियस तापमानात युद्धसराव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरतगड - राजस्थानातील वाळवंटात सूर्य आग ओकत असताना भारतीय वायुदल व लष्कराचे जवान येथे युद्धसराव करत आहेत. पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धसरावात ३० हजार जवान सहभागी झाले आहेत. अंबाला येथील "ब्रह्मशीरा' अभियानात २० हजार तर भटिंडा येथे चेतक कोरच्या "आक्रमण - २'मध्ये १० हजार जवान सहभागी झाले आहेत.
हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त : यात एमआय-३५ हेलिकॉप्टरच्या पथकानेही भाग घेतला. परंतु एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. रात्रीच्या वेळी गस्तीसाठी हे हेलिकॉप्टर उपयुक्त आहे. त्याचा सराव करत असताना १० फूट उंचीवरून संतुलन गमावल्याने हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले, पण तीन जवान सुखरूप बचावले. घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आग ओकणार्‍या सूर्याने तप्त झालेल्या वाळवंटातील युद्धाभ्यास