आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Soldiers Wife Comments On PM Narendra Modi Lahore Visit And Pathankot Attack

पाकिस्तानसोबत चर्चा करायची की नाही, शहिदांच्या पत्नींची PM ना कडक उत्तरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहीद गुरसेवक यांची शोकविलाप करताना पत्नी जसप्रीत - Divya Marathi
शहीद गुरसेवक यांची शोकविलाप करताना पत्नी जसप्रीत
भोपाळ- पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यात जवान शहीद झाले. अतिरेकी पाकमधूनच आले होते. आता पाकशी चर्चा करावी की नाही, अशी चर्चा सुरू आहे. १५ जानेवारीला चर्चा आहे. ‘भास्कर’ने पठाणकोटमधील शहिदांच्या पत्नींशी चर्चा केली. जणींशी चर्चा झाली. त्यांचे म्हणणे आहे की, आपण किती वेळा चर्चा करायची? मोदीजी चर्चेसाठीच लाहोरला गेले होते. काय मिळाले?

शहीद फतेह सिंह यांची पत्नी शोभा जेतुम्ही करता ते आम्हीही करू शकतो हे सांगावेच लागेल...
शोभा हरिद्वारला निघाल्या होत्या. म्हणाल्या, ‘आज त्यांच्या अस्थी गंगेत सोडण्यास आले आहे. आता त्यांची सोबत सुटली. माझ्यासारख्या स्त्रियांचा सरकारने विचार करावा. पाकशी चर्चा केली तर तो हल्ला करतो. तुम्ही जे करता ते आम्हीही करू शकतो हे पाकला सांगायला हवे. किती वेळा धोका खाणार?’

शहीद गुरसेवक यांची पत्नी जसप्रीत
चर्चेने वाद सुटला असता तर मग आमचे लोक का मारले?
‘चर्चेद्वारेवाद सुटला असता तर आमचे लोक शहीद का होऊ िदले? मी तर म्हणते बोलणी करूच नका. सडेतोड उत्तर द्या. मोदी चर्चा करायलाच लाहोरला गेले होते. काय झाले? नुकसानच ना? ते मैत्रीच्या लायकीचे नाहीत. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांशी मैत्री कशाला करायची?

हेमराजची पत्नी म्हणते, पाकचे तर नावही नको
चर्चा केली की पाक हल्ला करतो. परंतु ज्यांच्या घरी शहीद होतो, त्यांनाच दु:ख कळते. पाकिस्तान्यांचा उल्लेख केला तरीही डोके गरम होते. त्यांच्याशी बोलणी हवीतच कशाला? -धर्मवती,शहीद हेमराज यांची पत्नी (हेमराज यांचे डोके पाक जवानांनी कापले होते.)

पुढील स्लाईडवर वाचा, काय म्हणाल्या इतर शहिदांच्या पत्नी.....
इतरांच्या बरबादीसाठी पाकच्या माता मुलांना कशा पाठवतात?....
चर्चेने तर आम्ही मरतो...
घुसून हल्ला करा....