आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Information About Arrested ISIS Agent Form Jaipur

IS एजंटला अटक : ट्रेनिंगसाठी मुलीला सिरियाला नेण्याच्या प्रयत्नात होता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूरमधून अटक करण्यात आलेला ISIS एजंट सिराजुद्दीन. - Divya Marathi
जयपूरमधून अटक करण्यात आलेला ISIS एजंट सिराजुद्दीन.
जयपूर - राजस्थानची राजधानी जयपूरमधून अटक करण्यात आलेला ISIS चा एजंट सिराजुद्दीनने काही नवे खुलासे केले आहेत. एटीएसनुसार सिराज दोन महिन्यांनंतर दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी सिरियाला जाणार होता. त्यासाठी तो हैदराबाद आणि महाराष्ट्रातील दोन-दोन मुले आणि मुलींना तयार करत होता. हैदराबादहून 20 वर्षांची एक मुलगी त्याच्याबरोबर जायला तयारही झाली होती. तिलाही हैदराबाद पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली.

प्रकरण काय...
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा मार्केटिंग मॅनेजर मोहम्मद सिराजुद्दीन याला ISIS चा एजंट असल्याच्या आरोपात गुरुवारी रात्री उशिरा जयपूरमधून अटक करण्यात आली होती.
- तो जवाहर नगररच्या फ्लॅट बी-605 मध्ये राहत होता. त्या एजंटबाबत राजस्थान एटीएसला नॅशनल इनव्हेस्टीगेटिव्ह एजंसी (एनआयए) ने माहिती दिली होती.
- एनआयएला मिळालेल्या माहितीनुसार हा व्यक्ती सोशल मीडियावर ग्रुप बनवून ISIS ची पब्लिसिटी करत होता तसेच त्याचा इतर देशांमध्ये संपर्कही होती.
- त्याच्या रूममधून ISIS चे ऑनलाइन मॅगझिन 'दाबिक' चे काही अंकही मिळाले होते.
- एटीएसने सिराजची शुक्रवारी सलग 10 तास चौकसी केली.

चौकशीत अनेक नवे खुलासे
- ISIS च्या दहशतवाद्यांनी सिराजला 5 महिन्यांपूर्वी अर्जेंटिनाला बोलावले होते. याठिकाणाहून त्याला सिरियाला पाठवले जाणार होते.
- पण सिराजने हैदराबाद आणि महाराष्ट्रातून दोन-दोन मुले आणि मुलींना ट्रेनिंगसाठी तयार करत असल्याचे सांगत काही दिवसांचा वेळ मागितला होता.
- तो म्हणाल होता की, जयपूरमध्ये राहूनही त्याला आणखी काही मेंबर बनवायचे आहेत. सर्वांना सोबत घेऊन फेब्रुवारी किंना मार्च 2016 पर्यंत दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी येणार असल्याचे त्याने सांगितले होते.
- दरम्यान, सिराजच्याबरोबर सिरियाला जाण्यासाठी हैदराबादची अमिना (20) देखिल तयार झाली होती. तिला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे.
- सिराजच्या बरोबर जाणाऱ्या मुला मुलींना ट्रेनिंगसाठी सिरियाबरोबरच अर्जेंटिना, अमेरिका, फिलीपाइन्स आणि इराकलाही पाठवले जाणार होते.
- सिराज रोज 5 दहशतवाद्यांबरोबर चॅटिंग करायचा. तो मूळ गुलबर्गा, कर्नाटकच्या जवळ असलेल्या एका गावातील आहे.
- त्याच्या गावाजवळच इंडियन मुजाहिदीन (आयएम) चा दहशतवादी यासीन भटकळचे गाव आहे. त्यांचे काही संबंध आहेत का याचा शोधही घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही वेळ दिला नाही
- सिराजने जवाहर एन्क्लेव्हच्या पाच मजली इमारतीत रूफ टॉपवर सर्वात कोपऱ्यात असलेले क्वॉर्टर घेतले होते. त्याच्यावर कोणाची नजर पडू नये म्हणून त्याने असे केले होते.
- शंका येऊ ये म्हणून त्याने त्याची गर्भवती पत्नीला 4 महिन्यांपूर्वीच मुलासह कर्नाटकला घरी पाठवले होते.
- यास्मीनने महिनाभरापूर्वीच आणखी एका मुलालाही जन्म दिला होता. त्या बाळासोबतही सिराज थांबला नव्हता.
- यास्मीनही जोपर्यंत सिराजुद्दीनबरोबर राहिली तेवढे दिवस तिही शेजा-यांबरोबर फारशी बोलली नव्हती.
पुढे वाचा, म्हणाला चूक झाली, माफ करा, भविष्य बिघडेल...
अखेरच्या स्लाइडवर पाहा, काय म्हणतात सिराजचे शेजारी...