आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Members Of Indian Royal Families Who Were Struggling Survive

एकेकाळच्या Royal Families चे हे वंशज सध्या आहेत हलाखीच्या स्थितीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये विविध भागांमध्ये राजघराण्यांची सत्ता वर्चस्व होते. त्यांनी त्या काळामध्ये अगदी ऐशोरामामध्ये शाही पद्धतीने आपले आयुष्य घालवले. पण ब्रिटीशांकडून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशांतील सर्व राजे, महाराजे, महाराणी, निझाम, राजकुमार यांची संस्थाने खालसा करण्यात आली. त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आणि अधिकारही राहिले नाहीत.

अशा प्रकारे सर्व संस्थाने, राजेशाही, निझामशाही खालसा केल्यामुळे त्यावेळी ज्यांच्या हातामध्ये या सत्ता होत्या त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणे हे स्वाभाविकच होते. यांच्यापैकी काही ठरावीक जण हे मोठे उद्योगपती बनले काहींनी राजकारणामध्ये प्रवेश करत त्याठिकाणीही आपले वर्चस्व निर्माण केले. पण अनेक असेही होते, ज्यांना या सर्वांचा मोठा फटका बसला. त्यांनी स्वतःकडे असलेली संपत्ती, दागिने यांची विक्री करून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला पण तसे फार दिवस शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाचे भवितव्य अंधारात गेले. अशाच काही रॉयल फॅमिलिजचे वंशज आज हलाखीचे जीवन जगत आहेत. त्यांच्याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.

ओस्मान अली खान, हैदराबादचे अखेरचे निजाम


एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ख्याती असलेल्या हैदराबादच्या निजामाच्या वंशजाकडे त्यांच्या नखाएवढी संपत्तीही नाही असे म्हणता येईल.
20 व्या शतकाच्या सुरुवातीला निझामाकडे अफाट संपत्ती होती. त्यात सुमारे 10 कोटी युरोची किमतीची सोन्या चांदीची नाणी, 40 कोटी युरोंचे दागिने यांचा समावेश होता. 20 कोटी डॉलर एवढी किंमत असलेला हिरा तो पेपरवेट म्हणून वापरत होता. त्यांच्याकडे एखाद्या सर्कसचा तंबू भरेल एवढे मोती होते असेही म्हणतात. त्याच्या जनानखान्यातील 86 बायकांपासून झालेली मुले आणि त्याची 100 अनावरस दाम्पत्ये अशी त्याच्या संपत्तीवर दावा करणाऱ्या एकूण कायदेशीर वारसदारांची संख्या 400 होती. मात्र याच निजामाचे वंशज असलेले मुकर्रम जाह हे आज इस्तानबूलमध्ये अगदीच हलाखीचे जीवन जगत आहेत. मधुमेहाने ग्रस्त असलेले मुकर्रम एका छोट्याशा घरात राहतात. पूर्वजांच्या संपत्तीच्या केवळ कथाच ऐकल्या असल्याचे ते म्हणतात.
पुढील स्लाइड्सवर वाचा, भारतातील अशा काही रॉयल फॅमिलीज आणि त्यांच्या गरीब सदस्यांबाबत...