आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Son Killed His Mother And Sister In Hisar Tosham Haryana

खर्चासाठी पैसे न दिल्‍याने मुलाने आई-बहिणीची केली हत्‍या, घरातच पुरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तोशाम/भिवानी( हरियाणा) - खर्चासाठी पैसे न मिळल्‍याने एका मुलाने आपल्‍या आई आणि बहिणीची गळा आवळून हत्‍या केली. कुणाला संशय येऊ नये म्हणून प्रेतं घरातच पुरुन टाकली.
( फोटो - हत्या केल्‍यांनतर घरात पुरलेल्‍ो प्रेत काढताना लोक )
हरियाणामधील भिवानी जिल्‍ह्यातील खानक गावात हे प्रकरण घडले. मोबाईल आणि इतर खर्चासाठी पैसे न मिळाल्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आईचाच मुलाने खून केला आहे. हत्‍या करणा-या मुलाचे नाव अमरजीत (वय 19) आहे.
आरोपीच्‍या वडिलांनी पोलिसांमध्‍ये तक्रार दिल्‍यानंतर पोलिसांनी आरोपी अमरजीतला अटक केली.
अारोपीचे वडील अजीत यांनी सांगितले की, 'मी राजस्‍थान मध्‍ये दुकान चालवतो. 'घरी मुलगा अमरजीत (आरोपी) , अमरजीतची आई सुनीता (वय 50) आणि बहीण पूजा(वय 17) राहत होते. पत्‍नीला फोन केला परंतु, फोन लागत नव्‍हता. त्‍यावेळी मुलाला फोन केला असता मुलाने संतोषजनक उत्‍तर दिले नाही. घरी आल्‍यानंतर मुलाा विचारले असता त्‍याने त्‍याच्‍या आईआणि बहीणीची हत्‍या केल्‍याचे सांगितले'. नंतर आपण पोलिसांत तक्रार दिली.
पुढील स्‍लाइडव्‍ार पाहा, घटनास्‍थळाची छायाचित्रे..