आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त यासाठी आईला चाकूने भोसकले, पोलिसांनी पकडताच हसून गाऊ लागला हे गाणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलानेच आईवर चाकूने वार करून तिचा खून केला. - Divya Marathi
मुलानेच आईवर चाकूने वार करून तिचा खून केला.
वाराणसी - कलियुगी मुलाने रविवारी जन्मदात्या आईचा चाकूने भोसकून खून केला. खून केल्यावर उसाच्या शेतात जाऊन लपून बसला. पोलिसांनी तेथून पकडताच हसत-हसत गाणे गाऊ लागला. हसून म्हणाला-  'हम तो चले परदेस, हम परदेसी हो गये.' सध्या पोलिसांनी मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून आरोपी मुलाची चौकशी सुरू आहे.
 
असे आहे प्रकरण.... का मारले जन्मदात्रीला?
- सूत्रांनुसार, आरोपीची पत्नी माहेरात राहत होती. घरी आणण्यासाठी आई-बापाला पैशांची मागणी करत होता. 2 दिवसांपूर्वीच तो पत्नीला तिच्या माहेरात आणण्यासाठी गेला होता. पण त्याच्या सासू-सासऱ्यांनी मुलीला पाठवले नाही. म्हणून तो तणावात होता. शनिवारी संध्याकाळी वडिलांशी भांडून त्यांचेही त्याने डोके फोडले होते.
- गावकरी म्हणाले, सारनाथ कल्याणपूरचा रहिवासी रामनरेश सिंहला  3 मुले राजेंद्र ऊर्प कल्लू, सुरेंद्र आणि वीरेंद्र होते. वीरेंद्रचे दोन वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले होते.
- लहान मुलाच्या मृत्यूमुळे वडिलांनी कुणाकडून तरी 6 हजार रुपयांचे कर्ज घेतलेले होते. ते फेडण्यासाठी दुसरा मुलगा सुरेंद्र प्रतागडमध्ये नोकरी करत होता. रविवारी सुरेंद्र एक गाय घेऊन घरी परतला होता, या गाईला त्याची आई जानकीदेवी चारा टाकायला गेली. यादरम्यान घरात झोपलेला राजेंद्र उठून आला आणि चाकूने आईच्या मानेवर डझनभर वार केले, आई जागीच गतप्राण झाली.
- उपस्थित लोकांनी सांगितले की, खून करून आरोपी गावाबाहेरील उसाच्या फडात जाऊन लपला. गावकऱ्यांच्या सहकार्याने पोलिसांनी त्याला जेरबंद केले. या खुनात वापरलेला चाकूही हस्तगत करण्यात आला आहे.
 
काय म्हणतात पोलिस अधिकारी?
- एसओ सारनाथ अखिलेश मिश्रा म्हणाले, रविवारी दुपारी राजेंद्र सिंह ऊर्फ कल्लूने त्याच्या आईचा चाकूने असंख्य वार करून खून केला. त्याला अटक करण्यात आली असून, घटनेत वापरलेला चाकूही हस्तगत करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...