आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Son Of Asaram Bapu Narayan Sai Aide Mahendra Chawla Reveals How Asaram Used To Pick Girl

टॉर्चचा प्रकाश किंवा फळ फेकून सावज हेरायचे आसाराम बापू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्‍पवयीन मुलीच्‍या लैंगिक शोषणाच्‍या आरोपात अडकलेल्‍या आसाराम बापूंबद्दल त्‍यांच्‍या एका माजी सहका-याने खळबळजनक खुलासे केले आहेत. आसाराम बापूंच्‍या आश्रमात दिर्घ कालावधीपासून गैरव्‍यवहार होत आहेत, असे या सहका-याने सांगितले. आसाराम बापूंचा मुलगा नारायण साई याचे स्‍वीयसहायक म्‍हणून काम केलेल्‍या महेंद्र चावला यांनी काही गंभीर मुद्दे प्रकाशात आणले आहेत.

चावला यांनी सांगितले, आसाराम बापू मुलींना निवडण्‍यासाठी एक खास पद्धत वापरायचे. बापू टॉर्चचा प्रकाश टाकून किंवा फळ फेकून सावज निवडायचे. टॉर्चचा प्रकाश किंवा फळ 15 ते 35 वयोगटातील मुली किंवा महिलांवर फेकण्‍यात येत होता. त्‍यानंतर त्‍या मुलीला आसारामपर्यंत कसे पोहोचवावे, यासाठी त्‍यांचे चेले कामाला लागत. चावला यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीत ही माहिती उघड केली.

चावला म्‍हणाले, आसाराम बापूंवर लावण्‍यात आलेले सर्व आरोप खरे आहेत. ही काही नवी गोष्‍ट नाही. आश्रमात दिर्घ कालावधीपासून असे काम होत आहे. आतापर्यंत पोलिस आणि सरकार आसाराम बापूंच्‍या दबावाखाली होते. विरोध करणा-याल्‍या गप्‍प बसविण्‍यात येत होते. आसाराम बापूंचे समर्थक विरोध करणा-याच्‍या घरासमोर गोळा व्‍हायचे. त्‍यामुळे भीतीने कोणीहीह विरोध करत नव्‍हता. महेंद्र चावला यांनी जीवाला धोका असल्‍याचेही सांगितले. यापूर्वी नारायण साईने आपल्‍याला मारहाण केल्‍याचेही ते म्‍हणाले.