अमरोही (उत्तर प्रदेश) - भारतीय जनता पक्षाचे खासदार कंवरसिंह यांचे चिरंजीव मेहरसिंह यांना मौजमस्तीसाठी कॉलगर्लला बोलावणे महागात पडले आहे. मेहर उद्योगाच्या संबंधात मुंबईला गेले होते. मुंबईतील वाकोला भागातील एका पंचतारांकित हॉटेलात ते मुक्कामी होते. येथे त्यांनी एक्सॉर्ट सर्व्हिस पुरवण्याऱ्या एका एजंसीसोबत संपर्क केला. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनूसार, कॉलगर्लने चाकूचा धाक दाखवून मेहरकडून दी़ड लाख रुपये लूटले. मात्र, पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फूटेज तपासले त्यात लूट झाल्याचे निदर्शनास आले नाही.
खासदार महोदयांचे स्पष्टीकरण
चिरंजीवासोबत लूटमारीची घटना झाल्यानंतर त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न खासदार महोदयांकडून होत आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले, की माझा मुलगा मेहरसोबत त्याचा लंडनचा एक मित्र होता. त्याचे पूर्णनाव खासदार महोदयांना माहिती नाही, पण आडनाव गिल आहे. त्याच्यासोबत लूटीची घटना झाल्याचे ते म्हणाले.
मेहरने सांगितले कशी झाली लूट
मेहरसिंह यांच्या म्हणण्यानूसार, एस्कॉर्ट सर्व्हिसला फोन केल्यानंतर जेव्हा कॉलगर्ल आली तर तिने हॉटेलच्या बाहेरुनच फोन केला. मेहर हॉटेल बाहेर तिच्या कार जवळ गेला तेव्हा तिने त्याच्या पोटाला चाकू लावत पैशांची मागणी केली. घाबरलेल्या मेहरने खिशात असलेले दीड लाख रुपये काढून तरुणीच्या हातात ठेवले. पैसे घेऊन ती फरार झाल्यानंतर मेहर वाकोला पोलिस स्टेशनमध्ये गेले आणि लूटमार झाल्याची तक्रार दिली. त्यांनी तरुणीचे वर्णन केले त्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी केली आणि दोन संशयीतांना ताब्यात घेतले. लूटमारीची घटना हॉटेलच्या लॉबीमध्ये नाही तर कारमध्ये घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
सीसीटीव्ही फूटेज काही वेगळेच दाखवत आहे
पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फूटज तपासले, त्यात मेहर आणि त्याचा मित्र हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसतात मात्र तरुणी कारमध्येच बसलेली असते. काही वेळानंतर कार तेथून निघून जाते. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की फूटेजवरुन तरी लूट झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत नाही. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका संशयीताने सांगितले, की लूट करणारे कदाचित परप्रांतातील असण्याची शक्यता आहे.