आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JEE मेन्‍स परिक्षेमध्‍ये उदयपूरचा कल्पित टॉपर, वडील शासकीय हॉस्पिटलमध्‍ये कंपाऊडर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्पित वीरवल आई-वडीलांसोबत. - Divya Marathi
कल्पित वीरवल आई-वडीलांसोबत.
जयपूर- जेईई मेन्‍स परीक्षेचा (ज्‍वाइंट एन्‍ट्रस एक्‍झामिनेशन) निकाल जाहीर झाला आहे. यामध्‍ये उदयपूर शासकीय हॉस्पिटलमध्‍ये काम करणाऱ्या दलित कंपाऊडरच्‍या मुलाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. कल्पित वीरवल असे या मुलाचे नाव आहे. विशेष म्‍हणजे कल्पितने परिक्षेत 360 पैकी 360 गुण मिळवले आहे. असे करणारा तो देशातील पहिला विद्यार्थी ठरला आहे.
 
कल्पितने फिजिक्‍स, मॅथ्‍स आणि केमिस्‍ट्रीमध्‍ये 120 पैकी 120 गुण मिळवून हे यश संपादन केले. यापूर्वीही कल्पितने 'इंडियन सायन्‍स ओलंपियाड' आणि 'नॅशनल टॅलेंट सर्च' या देशपातळीवरील स्‍पर्धांमध्‍ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्‍याच्‍या या यशाबद्दल सर्व स्‍तरातून त्‍याचे अभिनंदन करण्‍यात येत आहे.

10.20 लाख विद्यार्थ्‍यांपैकी 2.20 लाख विद्यार्थी जेईई अॅडव्‍हांन्‍ससाठी पात्र
- जेईई मेन परिक्षेची ऑफलाईन परिक्षा 2 एप्रिल, 2017 रोजी आणि ऑनलाईन परिक्षा 8 व 9 एप्रिल रोजी झाली होती. 10 लाख 20 हजार विद्यार्थ्‍यांनी या परिक्षा दिल्‍या होत्‍या.
- यापैकी 2.20 लाख विद्यार्थी पुढील परिक्षा जेईई अॅडव्‍हान्‍स्‍डसाठी पात्र ठरले आहेत.
- जेईई परिक्षेद्वारेच  IITs, NITs, IITs आणि इतर शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्‍ये प्रवेश देण्‍यात येतो.
- या वर्षींच्‍या प्रवेशावेळी बारावीचे मार्क गृहीत धरले जाणार नाहीत. असा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला आहे.   
 
बातम्या आणखी आहेत...