आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई मेन्समध्ये कल्पित देशात प्रथम, मुलींत नाशिकची वृंदा राठी अव्वल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्पित वीरवल आई-वडीलांस - Divya Marathi
कल्पित वीरवल आई-वडीलांस
 कोटा/नाशिक- सीबीएसईने गुरुवारी जेईई मेन्सचा निकाल जाहीर केला. उदयपूर रेझोनन्सचा कल्पित वीरमाल १०० टक्के स्कोअर करून जेईई मेन्समध्ये देशात प्रथम आला. तर, मुलींमध्ये नाशिकची वृंदा नंदकुमार राठी ३६० पैकी ३२१ गुण (एअायअार १) मिळवून मुलींमध्ये देशात अव्वल ठरली. कल्पितने ३६० पैकी ३६० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. यात कोटा रेझोनन्सच्या विश्वजित अग्रवालने पाचवा क्रमांक प्राप्त केला. एलेनच्या अहमदाबाद सेंटरच्या वेदांतने चौथा, इंदूर सेंटरच्या अनन्य शर्माने १० वा, तर कोटी सेंटरमधील अभय गोयलने १२ वा क्रमांक पटकावला आहे.
 
उदयपूर रेझोनन्सचा कल्पित एससी प्रवर्गातील आहे. प्रवर्गातील एखाद्या विद्यार्थ्याने सर्वसामान्य प्रवर्गात पहिला क्रमांक मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल रेझोनन्स आणि एलेन करिअर कोटाच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना पेढे भरवून तोंड गोड केले.
 
वृंदाचे शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न :  वृंदाला बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट अाॅफ सायन्समध्ये प्रवेश घ्यायचा असून त्यासाठी ती प्रयत्न करीत अाहे. तिला शास्त्रज्ञ होण्याची इच्छा अाहे. वृंदा नाशिकमधील अायअायटीयन्स पेसची विद्यार्थिनी अाहे. दहावीलाही तिला ९४ टक्के गुण हाेते.

10.20 लाख विद्यार्थ्‍यांपैकी 2.20 लाख विद्यार्थी जेईई अॅडव्‍हान्‍ससाठी पात्र
- जेईई मेन परिक्षेची ऑफलाईन परिक्षा 2 एप्रिल, 2017 रोजी आणि ऑनलाईन परिक्षा 8 व 9 एप्रिल रोजी झाली होती. 10 लाख 20 हजार विद्यार्थ्‍यांनी या परिक्षा दिल्‍या होत्‍या.
- यापैकी 2.20 लाख विद्यार्थी पुढील परिक्षा जेईई अॅडव्‍हान्‍ससाठी पात्र ठरले आहेत.
- जेईई परिक्षेद्वारेच  IITs, NITs, IITs आणि इतर शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्‍ये प्रवेश देण्‍यात येतो.
- या वर्षींच्‍या प्रवेशावेळी बारावीचे मार्क गृहीत धरले जाणार नाहीत. असा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला आहे.   
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, नाशिकची वृंदा राठी जेईई परीक्षेत देशात मुलींमध्ये प्रथम
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 

 
बातम्या आणखी आहेत...