आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सुंदर गायिकेसोबत घडले असे काही, फेसबुकवर व्यक्त झाले दुःख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा - येथील दसरा मेळाव्याला राष्ट्रीय ओळख मिळाली नसली तरी इंटरनेटवर याची मोठी चर्चा सुरू आहे. कोटा जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित या दसरा मेळाव्यातील सिनेसंध्यामध्ये निमंत्रीत एका गायिकेने फेसबुकवर अधिका-यांच्या वर्तनासंबंधी प्रश्न उपस्थित केला आहे.
फिल्मस्टार नाइट कार्यक्रमासाठी आलेली सोना महापात्रा हिने आयएएस अधिकारी जेसी मोहंती यांच्या नावाने फेसबुकवर खुले पत्र लिहिले आहे. यात आरोप करण्यात आला आहे की, त्यांनी बंगल्यावर बोलावले, फोटो काढण्याचा आग्रह केला आणि त्यांचे म्हणणे एकले नाही तर यापुढे राजस्थानमध्ये कोणत्याही कार्यक्रमाला बोलावले जाणार नाही अशी धमकी दिली. एवढेच नाही तर रात्री-बेरात्री दार वाजवण्याचाही आरोप करण्यात आला आहे.
यासंबंधी सोनाची प्रतिक्रीया मिळू शकलेली नाही मात्र तिच्या व्यवस्थापकाने या आरोपांना दुजोरा दिला आहे. फेसबुकवरील सोनाच्या पोस्टवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. यात तिने नमुद केलेले अधिका-याचे नाव चुकीचे असल्याचीही एक कमेंट आहे. त्यावर सोनाने मला हेच नाव सांगितले गेले असल्याची कमेंट पोस्ट केली आहे. ती लिहिते, नावा पेक्षा ही घटना अपमानजनक आहे. जे लिहिले आहे, ते घडले आहे.
सोनाच्या पोस्टमुळे कोटाचे प्रशासन आणि विशेषतः दसरा मेळाव्याला गालबोट लागले आहे. मेळावा आयोजन समिती आणि अधिका-यांवर प्रश्न उपस्थित होते आहेत.