आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonaram Chaudhary To File Nomination From Barmer Today News In Marathi

सोनाराम यांनीही भरला अर्ज, काँग्रेस उमेदवाराला अडवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाडमेर/ नवी दिल्ली - राजस्थानच्या बाडमेर मतदारसंघातील राजकीय वातावरण आता हळूहळू तापायला लागले आहे. निवडणुकीच्या काही दिवसांआधी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये आलेले कर्नल सोनाराम चौधरी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

दरम्यान, अपक्ष म्हणून निवडणूक लढत असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंतसिंह यांनी आता नवीनच बाजू मांडली आहे. ‘मी मागे हटणार नाही. तसेच मी पक्ष सोडलाही नव्हता अन् सोडणारही नाही,’ असे रोखठोक मत त्यांनी मांडले आहे. दरम्यान, येथील राजकीय वातावरण पाहून काँग्रेसने उमेदवार हरीश चौधरी यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचे आदेश दिले आहेत.

जसवंतसिंहांनी पक्ष धोरण पाळावे- लालजी टंडन
लखनऊ - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार लालजी टंडन यांनी जसवंतसिंह यांच्यासह अन्य सर्व बंडखोर नेत्यांना पक्ष धोरणानुसार काम करण्याचा सल्ला दिला आहे. उमेदवारी देणे हा पक्षाचा विशेषाधिकार आहे. या प्रक्रियेत प्रत्येकाचे समाधान होणे शक्य नसते. राजकारणात एका नव्या पिढीचा उदय होत असताना, असे वाद होता कामा नयेत. ज्येष्ठांच्या जागा नेहमीच युवा नेते घेत असतात, पण त्यामुळे त्यांचे ज्येष्ठत्व धोक्यात येत नाही, असे टंडन यांनी म्हटले आहे. जसवंतसिंह यांच्या अपक्ष लढण्याचा निर्णय कोणालाही मान्य नसेल. पक्षाने नेहमीच त्यांचा सन्मान कायम ठेवणार असल्याची भूमिका घेतल्याचेही ते म्हणाले.

उमेदवारी नाकारणे राजकीय नाइलाज- राजनाथसिंह
सुषमा स्वराज यांनी जसवंतसिंह यांच्या उमेदवारीसंदर्भातील निर्णय केंद्रीय निवडणूक समितीने घेतला नव्हता, असे म्हटले होते. मात्र, भाजप अध्यक्ष राजनाथसिंह यांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. याउलट बाडमेरच्या जागेसंदर्भातही समितीने चर्चा केली होती. मात्र, इच्छा असूनही आम्हाला राजकीय नाइलाजामुळे जसवंतसिंह यांना उमेदवारी देता आली नाही, याची खंत असल्याचे राजनाथसिंह म्हणाले.