आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Soni Chourasiya Did Katthak Dance Continuously 87 Hr

सलग ८७ तास कथ्थक करुन अडखळल्या, सर्वाधिक वेळ कथ्थक केल्याचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- नृत्यांगना सोनी चौरसिया यांचे सलग १२४ तास कथ्थक करून जागतिक विक्रम करण्याचे स्वप्न मंगळवारी रात्री भंगले. रात्री दीडच्या सुमारास त्यांचे पाय डगमगले आणि त्या व्यासपीठावरच अडखळून पडल्या. तोपर्यंत सोनी यांनी ८७ तास १८ मिनिटे कथ्थक केले होते. केरळच्या हेमलता कमंडलू यांचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी वाराणशीच्या एका सभागृहात आपली नृत्य मोहीम हाती घेतली होती. हेमलता यांच्या नावावर १२३ तास १५ मिनिटांचे नृत्य करण्याचा विक्रम आहे. विक्रमासाठी स्पर्धकाला चार तास २० मिनिटांची विश्रांती घेता येऊ शकते. परंतु रात्री दोन वाजता त्यांनी पदन्यास न करण्याचा निर्णय घेतला. सोनीचे गुरू राजेश डोंगरा म्हणाले, कथ्थक मध्ये जागतिक विक्रम नोंदवला गेला आहे. हेमलता यांनी १२३ तास १५ मिनिटे कुचीपुडी नृत्य केले होते. सर्वाधिक कथ्थक करण्याचा जागतिक विक्रम लखनऊच्या रूचिका शर्मा यांच्या नावावर आहे. त्यांनी १६ तास
कथ्थक केले होते.

‘भविष्यातही प्रयत्न करत राहणार’
सोनी म्हणाल्या, मी आता थकले आहे. परंतु हार मानलेली नाही. त्यासोबतच नृत्य करताना माझे पाय मुळीच लटपटले नाहीत. मी नृत्याच्या मुद्रेतच खाली झुकले होते. थकल्यामुळे मी व्यासपीठ सोडले होते.