आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनिया म्हणाल्या, सासूची प्रतिमाच मुळात भीतिदायक असते, विशेषत: होणाऱ्या सासूची!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद - बऱ्याच दिवसांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींबाबत बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पहिल्या भेटीपासून ते निधनापर्यंत. ‘ तुम्ही इंदिराजींना का घाबरत होता?’ या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘सासूची प्रतिमाच भीतिदायक असते. विशेषत: होणाऱ्या सासूची.’ मुलाखतीचा हा संपादित भाग...

- इंदिरा गांधींशी तुमची पहिली भेट कधी झाली होती... तुम्हाला आठवते?
१९६५ मध्ये. इंदिराजींना राजीव व माझ्या जवळिकीची कुणकुण लागली होती. न्यूयॉर्कहून येताना त्या लंडनमध्ये थांबल्या होत्या. राजीवनी मला त्यांना भेटायला सांगितले. मी घाबरले. पहिल्या दिवशी तर भेटलेच नाही.

- तेव्हा त्या पंतप्रधान होत्या का?
नाही. राजीवनी दुसऱ्या दिवशी वेळ घेतली. तेव्हा इंदिराजींना भेटायला गेले. मला चांगले इंग्रजी येत नव्हते. म्हणून त्यांनी फ्रेंचमध्ये बोलायला सुरुवात केली आणि तू राजीवशी लग्न करू इच्छितेस का? असे विचारले.

- इंदिराजींनी घराणेशाही वाढवली का?
तसे नाही. कोणत्याही कुटुंबात मुलगा वडिलांचाच मार्ग निवडतो. राजकारणात थोडा फरक आहे. येथे एक तर तुम्हाला निवडले जाते किंवा पराभूत केले जाते.

- काँग्रेसला इंदिरा गांधींसारख्या नेत्यांची गरज असल्याचे काही जण म्हणतात?
प्रत्येक काळात वेगवेगळी आव्हाने असतात. १९६०-७० ची स्थिती भिन्न होती व गरजा वेगळ्या होत्या. काँग्रेसचे सध्याचे धोरण एकदम योग्य आहे.

- पीएम मोदी इंदिरांसारखेच कणखर असल्याचे काहींचे मत आहे?
मी सहमत नाही. इंदिरा व त्यांचे राजकारण विसरू नका. त्या काँग्रेसाध्यक्ष झाल्या व नंतर पीएम. पक्षात व पक्षाबाहेर त्यांची खिल्ली उडवली, मात्र त्यांनी हार मानली नाही. जिंकून पुनरागमन केले.

पुढील स्लाइडवर वाचा...राहुल गांधी कधी सूत्रे स्वीकारणार?

बातम्या आणखी आहेत...