आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: कधीकाळी वेट्रेस होत्‍या सोनिया, पहिल्‍या भेटीतच राजीव गांधी पडले प्रेमात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनिया गांधी यांची ओळख फक्‍त कॉंग्रेसपुरती मर्यादीत नाही तर जगभर सोनिया गांधी नावाला वलय प्राप्‍त झालेले आहे. कॉंग्रेसच्‍या राष्‍ट्रीय अध्‍यक्ष सोनिया गांधी यांचा आज 68 वा जन्‍मदिवस असल्‍यामुळे त्‍यांच्‍या विषयी माहिती देत आहोत. 9 डिसेंबर 1946 मध्‍ये 'इटली' मधील लुसिआना वेनेटो याठिकाणी सोनिया गांधी यांचा जन्‍म झाला. सोनियाचे वडील एका कंस्‍ट्रक्‍शन कंपनीचे मालक होते.
इटलीमध्‍ये जन्‍म झालेल्‍या सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांची हत्‍या झाल्‍यानंतर 1997 मध्‍ये कॉंग्रेस पक्षातून राजकीय मार्ग स्विकारला. आज सोनिया गांधी यांना जगातील सर्वात शक्‍तीशाली महिलांमध्‍ये समावेश झाला आहे. फोर्ब्स मॅगझीनने केलेल्‍या सर्वेमध्‍ये जगातील प्रसिद्ध आणि शक्‍तीशाली महिलांमध्‍ये समावेश झाल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.

लंडनमध्‍ये झाली होती राजीव-सोनियाची भेट-
1965 मध्‍ये राजीव आणि सोनियाची लंडन येथे भेट झाली होती. सोनिया त्‍यावेळी लंडनच्‍या एका रेस्‍टॉरंटमध्‍ये पार्ट टाईम वेटर्सचे काम करत होत्‍या. त्‍या रेस्‍टारंटमध्‍ये सोनियांना पाहताच राजीव त्‍यांच्‍या प्रेमात पडले.

3 वर्ष डेटिंग केल्‍यानंर 1968 मध्‍ये राजीव आणि सोनिया यांनी लग्‍न केले. हे लग्‍न अमिताभ बच्‍चन यांच्‍या घरी झाल्‍याचे बोलले जाते. कारण अमिताभची आई आणि इंदिरा गांधी दोघी चांगल्‍या मैत्रीणी होत्‍या.

सोनियांचे पूर्वीचे नाव (एंटानियो एडविग एलबिना माइनो Antonia Edvige Albina Maino) असे होते. आजही देशाच्‍या सर्वात शक्‍तीशाली महिलेमध्‍ये त्‍यांची गणना होते.

1984 मध्‍ये राजीव गांधीच्‍या हत्‍येनंतर कॉंग्रेसची धुरा सोनिया गांधीकडे आली.

राजकारणामध्‍ये येण्‍यापूर्वी राजीव गांधी पायलट होते. आपल्‍या कामामुळे भलेही त्‍यांना परिवारापासून दुर राहावे लागले असले तरी ते परिवारासोबत असताना सर्वांमध्‍ये आनंदाचे वातावरण असायचे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, सोनिया आणि त्‍यांच्‍या परिवाराची काही खास निवडक छायाचित्रे...