आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाच्या इशार्‍यावर भाजप नाचतोय - सोनिया गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुरादाबाद- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी यूपीच्या आंवला, बरेली आणि मुरादाबाद लोकसभा मतदारसंघात सभा घेतल्या. ही निवडणूक म्हणजे दोन भिन्न विचारसरणीमधील लढाई आहे. भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशार्‍यावर नाचत आहे. संकुचित आणि कट्टरवादी विचार समाजाचे विभाजन करणार आहे.

"एका बाजूला काँग्रेस आहे, जिचे नेतृत्व महात्मा गांधी, मौलाना आझाद यांच्यासारख्या महान नेत्यांनी केले आहे. त्यांचे बलिदान जनतेला ठाऊक आहे. दुसरीकडे एका संघटनेच्या (आरएसएस) तालावर नाचणारी एक विचारसरणी आहे. त्यांचा संकुचित आणि मूलतत्ववादी विचार समाजाचे विघटन करणारा ठरेल. ही विचारसरणी मूल्ये आणि परंपरेसाठी घातक आहे. त्यांनी कितीही बहकवण्याचा प्रयत्न केला, तरी तुम्ही त्यात अडकणार नाहीत, याचा मला विश्वास वाटतो."

"तुम्ही सपा-बसपचे विघातक राजकारण अनुभवले आहे. तुम्हाला भाजपचे राजकारण आणि धर्मवादाला ओळखता. ते धर्म आणि संप्रदायाच्या नावाखाली द्वेष पसरवतात. आपसांतच पेटवून देतात. परस्परांच्या विरोधात संघर्ष करायला लावतात. त्यामुळे निवडणुकीत विचारपूर्वक निर्णय घ्या."

काँग्रेस सरकारने अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करणे आणि राष्ट्रीय वक्फ मंडळाची स्थापना करणे यासारख्या गोष्टी करून दाखवल्या. सोबतच महिलांच्या बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे.

आमच्या यूपीए सरकारने गेल्या दहा वर्षांत जेवढा विकास केला. तेवढा पूर्वीच्या कोणत्याही काँग्रेसेतर सरकारने केला नाही, ही गोष्ट मला गर्वाने सांगाविशी वाटते. काँग्रेस देशातील सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन चालते. लोकांसाठी योजना, कार्यक्रम तयार केले आहेत. हाच काँग्रेस व इतरांमधील फरक आहे. हाच फरक आहे काम करणारे आणि बोलघेवड्यांमध्ये.

जात आणि धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करणार्‍यांना जनता जरूर धडा शिकवेल. भाजप आणि सपा राष्ट्रविरोधी पक्ष आहेत. काँग्रेसने विकास केला आहे तर भाजप आणि सपाने केवळ विभाजनाचे राजकारण केले आहे. विकास आणि बंधुभावासाठी या वेळी जनतेने काँग्रेसला पाठिंबा द्यावा. ही निवडणूक दोन भिन्न विचारसरणीच्या पक्षांमध्ये होत आहे. एकीकडे द्वेष पसरवणारे लोक आहेत. दुसरीकडे काँग्रेस आहे. परंपरा आणि तत्त्वे असलेला हा पक्ष आहे.