आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia Gandhi News In Marathi, Divya Marathi, Congress, Modi

देशाचा विकास केवळ भाषणांमधून होत नाही,सोनियांची मोदी व केजरीवाल यांच्यावर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखीमपूर/नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रविवारी आसामच्या लखीमपूर आणि दिल्लीच्या करोल बागमध्ये निवडणूक सभा घेतल्या. नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर त्यांनी यावेळी नाव न घेता टीका केली. देशात केवळ भाषणे करून विकास होत नसल्याचे त्या म्हणाल्या.


प्रत्येक वचन पूर्ण करणार
‘देशात जेव्हा भाजपचे सरकार होते, तेव्हा काय केले? विकास हा केवळ भाषणांमधून होत नसतो. विकासाच्या अनेक योजना यावेळीही काँग्रेसने जाहीरनाम्यातून मांडल्या आहेत. या जाहीरनाम्यातील प्रत्येक वचन आम्ही पूर्ण करू. काँग्रेसने आजवर जनतेला जी वचने दिली, ती सर्व करू.


विरोधक द्वेषाचे व्यापारी
विरोधक हे द्वेषाचे व्यापारी आहेत. काँग्रेसने देशाचा विकास आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातील जनतेच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. बोलणे आणि प्रत्यक्ष काम करण्यात खूप फरक आहे. काँग्रेसने देशाची गंगा-यमुना ही संस्कृती टिकवली आहे. भाजप मात्र देश कमकुवत बनवण्याचा प्रयत्न करत आहे.


सत्ता हे साधन आहे...
‘सत्ता हे तर साधन आहे. चांगली वृत्ती असेल, तर चांगले काम होते. वाईट वृत्तीमुळे विनाशच होतो. आपल्या देशात असे लोक आणि संघटनाही आहेत जे त्या वृत्तीचे आहेत, त्याच मार्गाचा अवलंब करतात, तसेच सााज व देशालाही त्याच मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतात. हा मार्ग विनाश आणि अंधकाराकडे नेणारा असतो.


आसाम । आम्ही खोटी वचने देत नाही
‘आम्ही खोटी वचने देत नाही. आम्ही जी वचने देतो, ती पूर्ण करतो. काँग्रेसला ‘हर हाथ शक्ती, हर हाथ तरक्की’ यावर विश्वास आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आसाम व इतर ठिकाणी काँग्रेस कार्यकर्तेÑ देशासाठी बलिदान देत होते.
दिल्ली । हा काही पोरखेळ नाही
‘तुमच्या समोर मैदानात असे लोक आहेत, ज्यांना सरकार चालवणे हा पोरखेळ वाटतो. पण तसे नाही. तुम्ही दिल्लीतही पाहिले आहे. दुस-यांना केवळ दुषणे देणारे अशा विचारांचे लोक रणांगण सोडून पळ काढतात.