आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia Gandhi News In Marathi, Election 2014, Narendra Modi

नरेंद्र मोदींनी इतिहास पुन्हा वाचावा; सोनिया गांधींचा सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरपूर- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजप नेते नरेंद्र मोदी यांना इतिहासाचे पुन्हा वाचन करावे, असा सल्ला दिला आहे. व्यासपीठावर राजद नेते रघुवंशप्रसाद सिंहदेखील होते.

नरेंद्र मोदी आजकाल व्याख्यान देत आहेत. जणू ते एकटेच धुतल्या तांदळातील आहेत. म्हणूनच सत्य जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी इतिहासाचे पुन्हा वाचन करावे. स्वातंत्र्यानंतर 67 वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेसने देशाची एकता व अखंडात अबाधित ठेवण्यासाठी अनेक बलिदान दिले आहेत.
गुजरातचा भ्रष्टाचार लपवला:
भ्रष्टाचार रोखला नसल्याचा ते आरोप करतात. असे असते तर काँग्रेसने आरटीआय आणले असते का ? गुजरातमध्ये मोदींचे ट्रॅक रेकॉर्ड काय आहे ? कलंकित व्यक्ती त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. ते आपल्या राज्याचा भ्रष्टाचार लपवतात.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, अदानींच्या पैशावर मार्केटिंग सुरू